AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊतांनी 12 आमदारांची नव्हे तर महाराष्ट्राची, कोरोनाग्रस्तांची काळजी करावी : देवेंद्र फडणवीस

जर व्यवस्था उभ्या केल्या नाहीत. तर आणखी मोठ्या समस्येला लोकांना सामोरे जावे लागेल," असेही फडणवीस (Devendra Fadnavis on Sanjay Raut Rokhthok) म्हणाले.

संजय राऊतांनी 12 आमदारांची नव्हे तर महाराष्ट्राची, कोरोनाग्रस्तांची  काळजी करावी : देवेंद्र फडणवीस
| Updated on: Jul 05, 2020 | 6:54 PM
Share

मुंबई : “शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी 12 आमदारांची काळजी करु नये. त्यांनी महाराष्ट्राची काळजी करावी. कोव्हिड रुग्णांची काळजी करावी,” अशी टीका भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. (Devendra Fadnavis on Sanjay Raut Rokhthok criticize Governor and Central Government)

“संजय राऊत यांनी 12 आमदारांची काळजी करु नये. त्यांनी महाराष्ट्राची काळजी करावी. कोव्हिड रुग्णांची काळजी करावी. ज्यांना उपचार मिळत नाही, अशा कोव्हिड रुग्णांचं काय होणार असा प्रश्न त्यांनी विचारला असता, तर मला जास्त आनंद झाला असता. मात्र संजय राऊत विषय डायव्हर्ट करु पाहत आहेत,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरातील महापालिका आणि कोरोनाविषयक तयारीचा आढावा घेत आहेत. आज त्यांनी भिवंडी महानगरपालिकेतील कोरोनाचा आढावा घेतलं. “मुंबई उपनगरात मोठ्या प्रमाणात कोरोना वाढतो आहे. जर व्यवस्था उभ्या केल्या नाहीत. तर आणखी मोठ्या समस्येला लोकांना सामोरे जावे लागेल,” असेही फडणवीस म्हणाले.

“कोरोनाच्या टेस्ट अपुऱ्या आहेत. लोकांना व्हेंटिलेटर्स मिळत नाही. उपनगराचा दौरा संपल्यावर सर्व अहवाल तयार करुन मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले.”

“सर्व पक्षीय बैठक बोलवण्याची मागणी मी करणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाटत असेल. तर त्यांनी बैठक बोलवावी. सर्वांची मत एकूण निर्णय घेतल्यास फायदाच होतो. पण आता सर्व पक्षीय बैठक बोलवायची की नाही हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.  (Devendra Fadnavis on Sanjay Raut Rokhthok criticize Governor and Central Government)

संजय राऊत काय म्हणाले होते?

“विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त 12 जागा भरायच्या आहेत. या 12 जागांचे राजकारण आताच सुरु झाले आहे. सरकारने शिफारस केलेले 12 सदस्य विधान परिषदेत जाऊ नयेत असे विरोधी पक्षाला वाटत आहे. महाराष्ट्रातील तीन प्रमुख राजकीय पक्ष एकत्र आले व त्यांनी 105 आमदारांचा सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला दूर ठेवून सरकार बनवले. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांत या 12 राज्यपाल नियुक्त सदस्यांची वाटणी होईल. हे 12 सदस्य कोण व त्यांची नेमणूक राज्यपाल करतील काय ? हाच प्रश्न आहे.” असे संजय राऊत म्हणाले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

“गृहखात्याचे काम कायदा-सुव्यवस्था, राष्ट्राची, राज्याची सुरक्षा राखणे हे प्रामुख्याने असते. पण गृहखात्याकडे पोलीस, गुप्तचर, राजभवनाचा ताबा असतो. राजकारणासाठी त्यांचा सर्रास वापर 50 वर्षांपासून सुरुच आहे. त्यामुळे पहाटे पहाटे सरकारचा शपथविधी करुन घेणारे राज्यातील नामनियुक्त 12 जागांचे राजकारण नक्कीच करतील व सर्व प्रकरण शेवटी राज्यपालांवर ढकलून नामानिराळे राहतील. राज्यपाल स्वतःच्या मर्जीने हे सदस्य निवडू शकत नाहीत. ही यादी मंत्रीमंडळाकडून ठरवली जाते. ती यादी राज्यपालांना बंधनकारक असते असे आपले संविधान सांगते, पण राज्यपाल या यादीवर निर्णय घेण्यास जास्तीत जास्त विलंब करतील. राज्यपाल व गृहखात्याच्या हातात सध्या इतकेच आहे,” असंही राऊत यांनी म्हटलं. (Devendra Fadnavis on Sanjay Raut Rokhthok criticize Governor and Central Government)

संबंधित बातम्या : 

‘राजकारणातली नवी आणीबाणी’, रोखठोकमधून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर प्रहार

निर्मला सीतारमण यांची काळ्या नागिणीशी तुलना, तृणमूल नेत्याची जीभ घसरली

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.