VIDEO : खडसेंबाबत प्रश्न विचारताच देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांसमोर हात जोडले

पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाहीत, पण माझा भरोसा नाही असे म्हणत एकनाथ खडसे यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर हल्ला केला. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, त्यांनी चक्क माध्यमांसमोर हात (Devendra fadnavis not answer eknath khadse question) जोडले.

VIDEO : खडसेंबाबत प्रश्न विचारताच देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांसमोर हात जोडले
Follow us
| Updated on: Dec 13, 2019 | 11:22 PM

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये अतंर्गत वाद सुरु आहे. भाजप नेते एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ गडावरुन केलेल्या भाषणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर घणाघात केला (Devendra fadnavis not answer eknath khadse question)  होता. पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाहीत, पण माझा भरोसा नाही असे म्हणत एकनाथ खडसे यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर हल्ला केला. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, त्यांनी चक्क माध्यमांसमोर हात (Devendra fadnavis not answer eknath khadse question) जोडले.

ठाण्यातील कोपरी येथे न्यू गावदेवी भाजी मार्केट आणि तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात महायज्ञाचे आयोजन करण्यात येते. यासाठी देवेंद्र फडणवीस ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी एकनाथ खडसे यांच्याबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हात जोडले. “बोललो बोललो, सगळं बोललो,” असेही फडणवीस यावेळी म्हणाले. यानंतर ते मुंबईला रवाना झाले.

पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाहीत, पण माझा भरोसा नाही : एकनाथ खडसे

“देवेंद्र फडणवीसांना पक्षाचा अध्यक्ष (प्रदेशाध्यक्ष) करायचं हे गोपीनाथ मुंडेंनी मला सांगितलं, मुंडे साहेबांनी सांगितलं म्हणून मी संमती दिली, पण ज्यांनी मोठं केलं त्यांनाच अशी वागणूक दिली”, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर हल्ला केला होता.

“मला सांगतात पक्षाच्या विरोधात बोलू नका, पण मी पक्षाच्या विरोधात कधी बोललोच नाही, मला पक्ष आणि नेते प्रिय, पण एकीकडे तोंडावर प्रेम करायचं आणि मागून पाडायचं हे आम्हाला दिसतं, हे घडलं नाही, घडवलं,” असाही घणाघात एकनाथ खडसे यांनी (Devendra fadnavis not answer eknath khadse question) केला.

“अजून पक्ष सोडायचा ठरलेलं नाही, मी पंकजाबद्दल बोलतोय, माझा भरोसा नाही, पक्षातून काढत नाहीत, आपोआप सोडून जातील अशी परिस्थिती करतात, आणि सांगायचं गोपीनाथ मुंडे असते, तर एकनाथ खडसेच मुख्यमंत्री झाला असता, माझ्याकडे बोलण्यासारखं खूप आहे, पण इथे बोलायला वेळ नाही,” असं एकनाथ खडसे म्हणाले.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.