AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे सरकार आणि आमदार प्रताप सरनाईकांविरुद्ध सोमय्यांची लोकायुक्तांकडे याचिका

किरीट सोमय्या यांनी लोकायुक्तांकडे याचिका दाखल केली आहे. 53 पानी याचिकेसोबत सर्व पुरावेही दाखल करण्यात आल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे.

ठाकरे सरकार आणि आमदार प्रताप सरनाईकांविरुद्ध सोमय्यांची लोकायुक्तांकडे याचिका
| Updated on: Feb 09, 2021 | 4:21 PM
Share

मुंबई : शिवसेनेचे मदार प्रताप सरनाईक आणि ठाकरे सरकारविरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लोकायुक्तांकडे याचिका दाखल केली आहे. 53 पानी याचिकेसोबत सर्व पुरावेही दाखल करण्यात आल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे. 2004 मध्ये बांधण्यात आलेलं विहंग गार्डनमधील दोन इमारती अनधिकृत आहेत. या इमारतीला अजून OC मिळालेली नाही. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या जमीन व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्या सातत्याने करत आहेत. आता त्यांनी या दोन्ही प्रकरणात लोकायुक्तांकडेच याचिका दाखल केली आहे.(Kirit Somaiya’s petition against CM Uddhav Thackeray and Pratap Sarnaik to Lokayukta)

प्रताप सरनाईकांवरील सोमय्यांचा आरोप काय?

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या कंपनीने 2004 साली बांधलेल्या विहंग गार्डनच्या दोन इमारती अजून अनधिकृत आहेत. या इमारतींना अद्याप OC मिळालेली नाही. गेल्या 13 वर्षांपासून प्रताप सरनाईक यांच्यावर कसलीही कारवाई झाली नाही. त्यांनी 11 कोटीच्या बदल्यात 25 लाक रुपये दंड भरला आहे. या प्रकरणात भाजपने हस्तक्षेप केल्यानंतर आता आता ठाणे महापालिकेनं त्यांची फाईल रोखली आहे. मात्र, ठाकरे सरकार प्रताप सरनाईक यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय.

बुधवारी अलिबागमध्ये भाजपचं आंदोलन

त्याचबरोबर उद्या अलिबागला भाजप आंदोलन करणार असल्याची माहितीही सोमय्या यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कोरलाई जमीन व्यवहाराची चौकशी करा, या मागणीसाठी हे आंदोनल होत असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान सोमय्या यांनी या जमीन व्यवहार प्रकरणात 1 फेब्रुवारीला कर्जत तहसीलदार यांची भेट घेतली होती. उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात कर्जतमधील जमिनीची अपूर्ण माहिती दिल्याचा आरोप सोमय्या यांचा आहे.

रश्मी उद्धव ठाकरे यांनी कर्जतमध्ये 8 एकर जमीन घेतली. भाऊ पाटणकर यांच्याकडून बहीण रश्मी ठाकरे यांनी जमीन विकत घेताना मध्ये बोगस बेनामी नावं का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला आहे. बहिणीने भावाकडून जमीन घेताना दोन बोगस बेनामी नावं उभी केली. ही कमाल उद्धव ठाकरेच करु शकतात. उद्धव साहेब जबाव दो, असं आव्हानच सोमय्या यांनी केलंय. कर्जत तहसील कार्यालयात माहितीच्या अधिकारात चौकशी करण्यासाठी सोमय्या यांनी कर्जत तहसीलदारांची भेट घेतली.

संबंधित बातम्या :

थातूरमातूर बोलू नका, सोमय्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या; राम कदम यांचं राऊतांना आव्हान

किरीट सोमय्यांनी पुन्हा वात पेटवली; ठाकरे सरकारच्या कथित तीन घोटाळ्यांची कागदपत्रे जाहीर

Kirit Somaiya’s petition against CM Uddhav Thackeray and Pratap Sarnaik to Lokayukta

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.