उद्धव ठाकरेंच्या टीकेला वांद्र्यात येऊन उत्तर देणार : नारायण राणे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या टीकेला माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेला वांद्र्यात येऊन उत्तर देणार, असं नारायण राणे (Narayan rane criticism on uddhav thackeray) यांनी स्पष्ट केलं आहे.

उद्धव ठाकरेंच्या टीकेला वांद्र्यात येऊन उत्तर देणार : नारायण राणे

सिंधुदुर्ग : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या टीकेला माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेला वांद्र्यात येऊन उत्तर देणार, असं नारायण राणे (Narayan rane criticism on uddhav thackeray) यांनी स्पष्ट केलं आहे. 16 ऑक्टोबर रोजी कोकणात शिवसेनेतर्फे प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्धव ठाकरेंसह शिवसेनेच्या नेत्यांनी नारायण राणेंवर निशाणा साधत त्यांच्यावर टीका केली होती. मात्र या टीकेला नारायण राणेंनी सडेतोड उत्तर (Narayan rane criticism on uddhav thackeray) देऊ , असं सांगितले.

“उद्धव ठाकरेंना माझी वाटचाल कमी माहीत आहे. पण भाजपला माझ्याबद्दल पूर्ण अभ्यास आहे. त्यांना माझ्याबद्दल बोलण्यासाठी 500 किलोमीटर येण्याची गरज नव्हती. पण माझ्यावर टीका करणे हा एकमेव त्यांचा उद्देश आहे. मी वांद्रयाला येऊन उत्तर देणार. मी काय शिवसेनेचे ऐकून घ्यायला राजकारणात आलेलो नाहीये. योग्य वेळेस उत्तर देईन, शिवसेना नेत्यांची हिम्मत नाही माझ्यासमोर येण्याची”, असं नारायण राणे म्हणाले.

“उद्धव ठाकरेंच्या टीकेची मी दखल घेत नाही. त्यांना माहीत आहे नारायण राणे कोकणात आहेत तोपर्यंत त्यांची डाळ शिजणार नाही. या भावनेतून त्यांनी मला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांच्या टीकेला योग्यवेळी उत्तर देईन”, असंही नारायण राणे म्हणाले.

राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे इथे येण्याने मला फरक पडत नाही. माझी पोट निवडणूक होती तेव्हा सर्वजण इथे आले होते. बाळासाहेबांसह सर्वजण आले होते. डिपॉझिट वाचवू शकले नाहीत. कोकणी माणूस राणेंवरची टीका खपवून घेत नाही. जे पोट नीवडणुकीत घडलं ते यंदा कणकवलीत घडणार आहे. शिवसेनेच्या उमेदवाराचे डिपॉझिटही राहणार नाही. कोकणी जनता योग्य ते उत्तर देईल”.

संजय राऊतांच्या टीकेला राणेंचे उत्तर

“370 कलम केव्हा लावतात याचा शिवसेना नेत्यांना अभ्यास नाही. प्रशासनाचे कायदे ओळखही नाही. अभ्यास नसल्यामुळे ते असं बोलत आहे”, अशी टीका नारायण राणे यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता केली.

संबधित बातम्या :

मातोश्रीच्या मिठाला न जागणाऱ्याने 10 रुपयांच्या थाळीबद्दल शिकवू नये, उद्धव ठाकरेंचा राणेंवर प्रहार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI