AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर ‘सामना’च्या ऑफिसमध्ये येऊन ‘प्रसाद’ देईन; नितेश राणेंचा संजय राऊतांना इशारा

Nitesh Rane Sanjay Raut | 'शिवप्रसाद' काय असतो, ते संजय राऊतांनी आमदार वैभव नाईक यांना विचारावे. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पोटभर 'प्रसाद' दिला आहे. पाहिजे असेल तर तुमच्यासाठी मी सामना ऑफिसमध्ये पार्सल घेऊन येतो.

...तर 'सामना'च्या ऑफिसमध्ये येऊन 'प्रसाद' देईन; नितेश राणेंचा संजय राऊतांना इशारा
नितेश राणे आणि संजय राऊत
| Edited By: | Updated on: Jun 19, 2021 | 3:41 PM
Share

मुंबई: शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये सिंधुदुर्गात झालेल्या राड्यानंतर नारायण राणे यांचे सुपूत्र आणि भाजप आमदार नितेश राणे हे प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यांनी ट्विट करुन शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना इशारा दिला आहे. (BJP Leader Nitesh Rane slams Sanjay Raut)

‘शिवप्रसाद’ काय असतो, ते संजय राऊतांनी आमदार वैभव नाईक यांना विचारावे. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पोटभर ‘प्रसाद’ दिला आहे. पाहिजे असेल तर तुमच्यासाठी मी सामना ऑफिसमध्ये पार्सल घेऊन येतो. टेस्ट आवडेल नक्की, असे नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता संजय राऊत यावर काय प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त वैभव नाईक यांनी भाजपला डिवचण्यासाठी येथील एका पेट्रोल पंपावर स्वस्तात पेट्रोल वाटप सुरु केले होते. मात्र, हा पेट्रोलपंप नेमका नारायण राणे यांच्या मालकीचा निघाला. वैभव नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते पेट्रोल पंपावर नागरिकांना पेट्रोल खरेदी करण्यासाठी पैसे वाटत होते. त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते त्याठिकाण आले आणि त्यांनी आक्षेप घेतला. तेव्हा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणबाजी सुरु केली आणि एकमेकांच्या अंगावर धावून गेले. विशेष म्हणजे आमदार वैभव नाईक यांनीही या हाणामारीत भाग घेण्याचा प्रयत्न केला. ते भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावूनही गेले होते. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. यानंतर वैभव नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते दुसऱ्या पेट्रोल पंपावर निघून गेले.

भाजपचं ओळखपत्र दाखवा, पेट्रोल मोफत मिळवा; शिवसेनेच्या वर्धापनदिनी खास ऑफर

शाब्दिक आरोप-प्रत्यारोप, वाद आणि राडे करुन झाल्यानंतर आता शिवसेना-भाजप यांच्यात पुन्हा एकदा जुंपण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या वर्धापनदिनी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करुन भाजपला (BJP) डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेचा (Shivsena) आज 55 वा वर्धापनदिन आहे. यानिमित्ताने आमदार वैभव नाईक यांनी स्वस्त दरात पेट्रोल वाटपाची घोषणा केली आहे.

त्यानुसार सर्वसामान्य नागरिकांना 100 रुपयांत 2 लिटर पेट्रोल (प्रति वाहन) देण्यात येणार आहे. तर भाजप सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखवणाऱ्यांना प्रत्येकी 1 लीटर पेट्रोलचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. वैभव नाईक यांच्या या उपक्रमाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

संबंधित बातम्या:

शिवसेना भवनानंतर कोकणातही राडा, आमदार वैभव नाईक राणेंच्या पेट्रोल पंपावर, सेना-भाजप धुमश्चक्री

नारायण राणेंच्या पेट्रोल पंपावर शिवसेनेचा राडा; निलेश राणे संतापाच्या भरात म्हणाले…

वर्धापनदिनी सेनेची डरकाळी, अंगावर याल तर ‘हर हर महादेव’ गर्जना करुन हिशेब करु, भाजपला इशारा

(BJP Leader Nitesh Rane slams Sanjay Raut)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.