ठाकरे सरकार ‘चायना मेड’ डुप्लिकेट सरकार, शिवाजी महाराजांवरील प्रेम हा त्यांचा निवडणुकीचा अजेंडा : निलेश राणे

भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मनाई आदेश झुगारून आज (19 फेब्रुवारी) शेकडो भाजप कार्यकर्त्यांसह सिंधुदुर्ग किल्यावर शिवजयंती साजरी केली.

ठाकरे सरकार 'चायना मेड' डुप्लिकेट सरकार, शिवाजी महाराजांवरील प्रेम हा त्यांचा निवडणुकीचा अजेंडा : निलेश राणे
निलेश राणे, माजी खासदार


सिंधुदुर्ग : भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मनाई आदेश झुगारून आज (19 फेब्रुवारी) शेकडो भाजप कार्यकर्त्यांसह सिंधुदुर्ग किल्यावर शिवजयंती साजरी केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ठाकरे सरकार हे चायना मेड असलेले डुप्लिकेट सरकार असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला (BJP Leader Nilesh Rane criticize Shivsena over Shivaji Maharaj Jayanti in Sindhudurg).

निलेश राणे म्हणाले, “शिवनेरीवर सामान्य शिवभक्तांना 144 कलम लागू केले आणि मुख्यमंत्री, उपमुख्यामंत्री हेलिकॉप्टरने गेले. शिवभक्तांचा हा अपमान महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. याठिकाणी शिवरायांच्या पालखीला शिवाजी महाराजांच्या गादिचे वंशज छत्रपती संभाजी राजे यांना साधा हातही लावायला दिला नाही. हा छत्रपतींच्या गादीचा अपमान आहे. त्यामुळे अशा लोकांच्या पाठीमागून संभाजी राजे यांनी फरफटत जाऊ नये. उभा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे.”

“शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये गड किल्ल्यांना द्यायला पैसे नाहीत हे दुर्दैव आहे. या सरकारचे शिवाजी महाराजांवरचे प्रेम डुप्लिकेट आहे. इतकी वर्ष होऊनही शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी हे सरकार पैसे देऊ शकलेले नाही. जाहीर केलेले पैसेही द्यायला सरकारला जमत नाही. कोरोनाचे कारण सांगताहेत. शिवरायांबद्दलचे शिवसेनेचे प्रेम हे केवळ दाखविण्यासाठी आणि लोकांना मूर्ख बनविण्यासाठी आहे. हा त्यांचा निवडणुकीचा अजेंडा आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला केव्हाच लक्षात आलं आहे,” असंही निलेश राणे म्हणाले.

हेही वाचा :

धनंजय मुंडे टोकाचे निर्लज्ज, बलात्काराच्या आरोपानंतरही राजीनामा दिला नाही: निलेश राणे

राजीनामा देऊन काय मेहेरबानी केली नाही, आता तातडीने गुन्हा दाखल व्हावा: निलेश राणे

कारखान्याला फुकट पैसा आणि भ्रष्टाचार लपवण्यासाठी पवारांवर प्रेम दाखवावं लागतं’, निलेश राणेंचा जयंत पाटलांना टोला

व्हिडीओ पाहा :

BJP Leader Nilesh Rane criticize Shivsena over Shivaji Maharaj Jayanti in Sindhudurg

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI