उद्या राजकीय भूकंप करणार का? पंकजा मुंडे म्हणतात- हो, पण…..

मी आत्मपरिक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. यात वेगळं काही नाही. मी नाराज नाही," असे वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी (Pankaja munde exclusive interview)  केले.

उद्या राजकीय भूकंप करणार का? पंकजा मुंडे म्हणतात- हो, पण.....

मुंबई : “राजकारणात येण्यासाठी मी कारण नव्हते, तर लोक होते. त्यामुळे लोकांना काय हवं आहे हे लक्षात घेऊनच निर्णय घ्यायचा आहे. मी पहिल्यांदाच निवडणुकीत पराभूत झाले. त्यामुळे ही परिस्थिती वेगळी आहे. म्हणूनच मी आत्मपरिक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. यात वेगळं काही नाही. मी नाराज नाही,” असे वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी (Pankaja munde exclusive interview)  केले. ‘टीव्ही 9 मराठी’शी मुलाखत देताना पंकजा मुंडे यांनी अनेक प्रश्नांची उत्तर (Pankaja munde exclusive interview) दिली.

या चर्चेदरम्यान पंकजा मुंडेंना तुम्ही उद्या राजकीय भूकंप करणार का? असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी पंकजा मुंडे (Pankaja munde exclusive interview) म्हणाल्या, “तुम्ही एवढ्या अपेक्षा वाढवून ठेवल्या आहेत. आता काय करणार? पण भूकंप काही चांगली गोष्ट नाही. कुणाचीही हानी होणार नाही असा भूकंप करण्याचा प्रयत्न करेन.”

“माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या घरी येऊन चर्चा (Pankaja munde exclusive interview) केली.” असेही त्या म्हणाल्या.

“माझ्याकडून कधीही माध्यमांना बातम्या पुरवल्या नाहीत. आमची भेट उशिरा झाल्याने माध्यमांना याविषयी माहिती मिळाली नसावी आणि मीही कुणाला या व्यक्तिगत भेटीबद्दल सांगत नाही.” असेही त्या (Pankaja munde exclusive interview) म्हणाल्या.

“मी वैयक्तिक कुणावरही नाराज नाही. पण मी कार्यपद्धतींवरील दोषांवर बोलते. माझी वाढ तशीच झाली आहे. पाच वर्षात खूप गोष्टी बदलल्या आहेत. त्याविषयी मी कार्यकर्त्यांशी बोलेन,” असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.

“संघर्षाशिवाय काहीच होत नाही” 

“मला जातीचा विषय असा मांडता येणार नाही. हा पक्ष केवळ मुठभर लोकांचा, विशिष्ट जातीचा आहे असं म्हटलं जात होतं. मात्र, गोपीनाथ मुंडे यांनी ही भाजपची ही प्रतिमा बदलली. त्यामुळे हा पक्ष बहुजनांचा होण्यामागे गोपीनाथ मुंडे यांचा मोठा वाटा आहे. संघर्षाशिवाय काहीच होत नाही. साधी नोकरीही मिळत नाही. त्यामुळे मीही संघर्ष करत आहे. माझा संघर्ष न्याय्य भूमिकांसाठी आणि तळागाळातील लोकांसाठी असेल.” असेही पंकजा मुंडेंनी स्पष्ट (Pankaja munde exclusive interview) केले.

“ओबीसी भाजपपासून दूर जात असतील तर त्यांना दूर जाऊ देऊ नये म्हणून आम्ही काम करायला हवं. लोकांच्या मनात आपल्या नेत्यांकडे दुर्लक्ष होत आहे अशी प्रतिमा असेल तर त्यावर काम करायला हवं. माझ्याकडे आज रात्र आहे, मी उद्या बोलेन,” असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले

“कोणत्याही पक्षात दोन चार गट असतात.  मोठ्या संघटनांमध्ये नाराजी असते, नेत्यांनी ती बोलूनही दाखवली आहे. त्यामुळे ते नाकारता येणार नाही. माझ्याविषयी मी सांगू शकते. मी माझी भूमिका मांडलेली नाही. पण मी नाराज होत नाही. कारण मी कुणाकडून अपेक्षा ठेवावी असं काही नाही. ज्या लोकांशी खरं नात आहे त्यांच्याशी मी संवाद साधेन,” असेही पंकजा मुंडे (Pankaja munde exclusive interview) म्हणाल्या.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI