AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pankaja Munde Isolated | विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानाची धामधूम, मतदानापूर्वी पंकजा मुंडे ‘आयसोलेट’

मात्र अद्याप त्यांना कोरोनाची लागण झाली आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Pankaja Munde Isolated Before Aurangabad Graduate Constituency Election Voting)

Pankaja Munde Isolated | विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानाची धामधूम, मतदानापूर्वी पंकजा मुंडे 'आयसोलेट'
pankaja munde
| Updated on: Dec 01, 2020 | 7:20 AM
Share

मुंबई : राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी आज (1 डिसेंबर) मतदान पार पडत आहे. मात्र या मतदानापूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे या आयसोलेट (विलग) झाल्या आहेत. त्यांनी रात्री उशिरा ट्वीट करत कार्यकर्त्यांना याबाबतची माहिती दिली. (Pankaja Munde Isolated Before Aurangabad Graduate Constituency Election Voting)

“पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की आपण शिरीषजी बोराळकर यांना पहिल्या पसंदीचे मत देऊन विजयी करावे. मला सर्दी खोकला व ताप आहे. त्यामुळे मी जवाबदारी स्वीकारून isolate झाले आहे..अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी,” असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी रात्री 11.31 च्या सुमारास पोस्ट केले.

सर्दी, खोकला, ताप ही सर्व कोरोनाची लक्षण आहेत. पंकजा मुंडेंना ही सर्व लक्षण जाणवू लागल्यानं त्यांनी स्वत:ला isolate केले आहे. मात्र अद्याप त्यांना कोरोनाची लागण झाली आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

तसेच औरंगाबादमधून शिरीष बोराळकर यांना मत देऊन विजयी करा, असेही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अर्थातच महाविकासआघाडीने एकत्रित ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील या नव्या समीकरणांमुळे ही निवडणूक फार चुरशीची बनली आहे.

हेही वाचा – औरंगाबाद पदवीधर मतदरासंघाची लढाई भाजपसाठी अवघड

औरंगाबाद (मराठवाडा) पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपचे मनसुबे यंदा धुळीस मिळण्याची शक्यता जास्त आहे. निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना या मतदारसंघात भाजपसाठी प्रतिकूल गोष्टी घडताना दिसत आहेत. भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे नाराज झालेले ज्येष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि थेट राष्ट्रवादीत सामील झाले.

औरंगाबादमध्ये कोणाकोणात लढत?

शिरीष बोराळकर (भाजप) vs प्रवीण घुगे (भाजप बंडखोर) vs रमेश पोकळे (भाजप बंडखोर) vs नागोराव पांचाळ (वंचित) (Pankaja Munde Isolated Before Aurangabad Graduate Constituency Election Voting)

संबंधित बातम्या : 

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस

पदवीधर निवडणूक : भाजपात डबल बंडखोरी, पंकजा समर्थकाचा उमेदवारी अर्ज, माजी जिल्हाध्यक्षाचाही बंडाचा झेंडा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.