AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जनतेच्या कामांना नाकारले; जनतेने तुम्हाला नाकारले एवढं सोप्प गणित आहे, प्रसाद लाड यांचा शिवसेनेला टोला

'उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील याच भीतीने भाजपाने शिवसेना फोडली असं वरून सरदेसाई म्हणतात. हे म्हणजे असं झालं गिरे तो भी टांग उपर' अशी बोचरी टीका प्रसाद लाड यांनी केली आहे. 

जनतेच्या कामांना नाकारले; जनतेने तुम्हाला नाकारले एवढं सोप्प गणित आहे, प्रसाद लाड यांचा शिवसेनेला टोला
Image Credit source: tv9
| Updated on: Sep 11, 2022 | 12:11 PM
Share

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) नेते वरून सरदेसाई (Varunu Sardesai) यांनी आपल्या मराठवाडा दौऱ्यामध्ये भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. तसेच मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महत्त्वाची जबाबदारी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर असेल असंही त्यांनी म्हटलं. कोणी कितीही प्रयत्न करा मुंबईकर ठामपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभे राहातील असं सरदेसाई म्हणाले होते. सरदेसाई यांच्या टीकेला आता भाजप नेते प्रसाद लाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ट्विट करत वरून सरदेसाई यांच्यावर निशाणा साधला. ‘उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील याच भीतीने भाजपाने शिवसेना फोडली असं वरून सरदेसाई म्हणतात. हे म्हणजे असं झालं गिरे तो भी टांग उपर’ अशी बोचरी टीका प्रसाद लाड यांनी केली आहे.

वरून सरदेसाईंवर निशाणा

प्रसाद लाड यांनी वरून सरदेसाई आणि शिवसेनेला ट्विटच्या माध्यमातून टोला लगावला आहे. ‘उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील याच भीतीने भाजपने शिवसेना फोडली!’- वरुण सरदेसाई, हे म्हणजे अस झाल -“गिरे तो भी टांग उपर” तुम्ही जनतेच्या कामांना नाकारले, जनतेने तुम्हाला नाकारले! एवढं सोप्प गणित असताना, स्वतःची पाठ थोपटून घेण्याचे प्रकार आता तरी सोडा!’ असं ट्विट  प्रसाद लाड यांनी केलं आहे.

नेमकं काय म्हटलं होत सरदेसाई यांनी?

वरून सरदेसाई यांनी आपल्या मराठवाडा दौऱ्यात शिंदे गट आणि भाजपावर जोरदा टीके केली होती. तसेच त्यांनी मनसे आणि शिंदे गटाच्या संभाव्य युतीवर देखील भाष्य केलं होतं. शिवसेनेने गेल्या तीस वर्षांमध्ये अनेक वादळे पेलली आहेत. त्यामुळे तीन काय तीस पक्ष जरी एकत्र आले तर काहीही फरक पडणार नाही असं सरदेसाई यांनी म्हटलं होतं. आता लाड यांनी सरदेसाई यांच्या या टीकेचा चांगलाच समाचार घेतलाय.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...