AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आश्वासनांची पोलखोल, आदित्य ठाकरेंवर निशाणा; दरेकरांच्या पुस्तिकेतून ठाकरे सरकारचा पंचनामा

राज्यातील ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असून विरोधकांनी ठाकरे सरकारच्या कारभाराची पिसे काढण्यास सुरुवात केली आहे. (pravin darekar attacks thackeray government)

आश्वासनांची पोलखोल, आदित्य ठाकरेंवर निशाणा; दरेकरांच्या पुस्तिकेतून ठाकरे सरकारचा पंचनामा
| Updated on: Nov 28, 2020 | 9:39 PM
Share

मुंबई: राज्यातील ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असून विरोधकांनी ठाकरे सरकारच्या कारभाराची पिसे काढण्यास सुरुवात केली आहे. आज दिवसभरात भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारच्या कारभाराची पोलखोल केलेली असतानाच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी एक पुस्तिकाच छापून सरकारचा पंचनामा केला आहे. (pravin darekar attacks thackeray government)

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर लिखित ‘वर्षपूर्ती झाली वचनपूर्तीचे काय?’ या पुस्तिकेचे प्रकाशन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात सरकारची कामं, त्यांची आश्वासन आणि जनतेची फसवणूक यावर भर देण्यात आला आहे. तसेच हे सरकार खोटारडे आणि भूलथापा देणारे असल्याचं नमूद करण्यात आले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाचे दाखले देऊन सरकारला अडचणीत आणण्याचा दरेकर यांनी प्रयत्न केला आहे.

आदित्य ठाकरेंवर हल्ला

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव आम्ही कधीच घेतलं नसल्याचं भाजप नेत्यांनी वारंवार सांगितलं होतं. मात्र, सुशांतप्रकरणाचा उल्लेख न करता दरेकर यांनी या पुस्तकातून आदित्य यांच्यावर अप्रत्यक्ष हल्ला केला आहे. ”युवराजाचे नाव एका प्रकरणात आल्यानंतर जणू काही हा महाराष्ट्राचा अपमान आहे, असं वृत्तवाहिन्यांवर भासविणाऱ्या नेत्यांना महाराष्ट्रातील दीनदलित, गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी मराठी माणसांच्या मुलींवर राजरोसपणे बलात्कार होत आहेत. ही बाब महाराष्ट्राचा अपमान करणारी आहे, असं वाटत नाही काय?” असा सवाल दरेकर यांनी केला आहे.

या पुस्तकात आदित्य यांचा थेट उल्लेख करण्याऐवजी दरेकर यांनी त्यांना युवराज असं संबोधून सुशांत प्रकरणावरून घेरण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपकडून या प्रकरणात आदित्य यांच्यावर थेट टीका करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दरेकरांकडून हल्लाबोल

  • काहीही संबंध नसताना मातोश्री उडवण्याची धमकी आल्याची बातमी सोडण्यात आली.
  • महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी आयपीएस अधिकाऱ्यांनी कट केल्याची पुडी सोडण्यात आली.  (pravin darekar attacks thackeray government)

दरेकरांकडून पोलखोल

आश्वासन: ऑक्टोबर 2019मध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हेक्टरी 25000 रुपये मदत देण्याची घोषणा केली होती.

पोलखोल: प्रत्यक्षात राज्यपालांनी घोषित केलेल्या रकमेव्यतिरिक्त एक दमडीही दिली नाही. (आणि म्हणतात, मी खोटे बोलत नाही.)

आश्वासन: शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफी देणार नाही तर कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करण्याचं आश्वासन दिलं होतं.

पोलखोल: पण खरंच कर्जमुक्ती झाली का? राहिला प्रश्न चिंतामुक्तीचा तर महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून राज्यात 1976 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. (आणि म्हणतात, मी खोटे बोलत नाही.)

आश्वासन: पीकविमा कंपन्याच्या अटी व शर्ती बदलून शेतकरी धार्जिण्या करू. तालुका, सर्कलस्तरावर विमा कंपन्यांचे कार्यालय सुरू करू.

पोलखोल: प्रत्यक्षात कंपन्यांना फायदा होईल अशाच अटी टाकल्या. एकाही तालुक्यात विमा कंपन्यांचे कार्यालय सुरू नाही. (आणि म्हणतात, मी खोटे बोलत नाही.)

आश्वासन: प्रत्येक जिल्ह्यात एक महिला बचत गट भवन उभारणार

पोलखोल: प्रत्यक्षात एकाही जिल्ह्यात नवीन महिला बचत गट भवन सुरू केले नाही. (आणि म्हणतात, मी खोटे बोलत नाही.)

आश्वासन: शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थींनींना व्हेडिंग मशीनद्वारे मोफत सॅनिटरी नॅपकिन देणार

पोलखोल: प्रत्यक्षात एकाही महाविद्यालयात व्हेडिंग मशीन लावण्यात आल्या नाहीत. (आणि म्हणतात, मी खोटे बोलत नाही.)

आश्वासन: राज्यातील प्रत्येक नागरिकाला स्वत:चे घर देणार

पोलखोल: वर्षभरात एकही घर दिलं नाही. (आणि म्हणतात, मी खोटे बोलत नाही.) (pravin darekar attacks thackeray government)

संबंधित बातम्या:

‘राज्य सरकारने निर्णय घेतल्याशिवाय वीजबिल भरु नका’, कल्याणचे शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रेंचं आवाहन

सरकारचं एक वर्षातलं अचिव्हमेंट काय? फडणवीसांच्या टीकेला सामंतांचं प्रत्युत्तर

महाविकासआघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण, मात्र अचिव्हमेंट काय?, देवेंद्र फडणवीसांची सडकून टीका

(pravin darekar attacks thackeray government)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.