जिना यहाँ मरना यहाँ…. खडसे दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही: सुधीर मुनगंटीवार

जिना यहाँ मरना यहाँ.... खडसे दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही: सुधीर मुनगंटीवार

एकनाथ खडसे भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. (Sudhir Mungantiwar On Eknath Khadse may join NCP) 

Namrata Patil

|

Sep 23, 2020 | 2:02 PM

मुंबई : भाजप नेते एकनाथ खडसेंना दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली, तरी ते भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. भाजपचा उत्तर महाराष्ट्रातील एक बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. हा बडा नेता म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हेच असल्याचं सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यालयात खलबतं सुरु आहेत. यावर मुनगंटीवार यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. (Sudhir Mungantiwar On Eknath Khadse may join NCP)

सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले?

“मी १९८० पासून भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहे. त्यांच्याशी अनेकदा बैठकीत, वैयक्तिक, प्रत्यक्ष संपर्क आला. त्यांची वैशिष्ट्यं, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू मी समजून घेतले आहेत. ते कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे नेते आहेत. जिना यहा मरना यहा इसके सिवा जाना कहा, काही घटनांबद्दल मनामध्ये दु:ख असू शकते. पण कार्यकर्ता म्हणून एक विश्वास आहे की खडसे हे भाजप सोडून दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही,” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले

“दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली, तरीही खडसेंचा डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊ देत नाही, प्रतिबंध घालतो. त्यामुळे खडसेंच्या मनाला दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचारच शिवू शकत नाही. हा विचार माझ्याही मनात शिवू शकत नाही आणि त्यांच्या मनात हा विचार येऊ शकत नाही.”

“कधी कधी क्रोध आणि रागाच्या मनात ते असं म्हणतात की मला विचार करावा लागेल. पण मी तुम्हाला १०० टक्के सांगतो की ते जेव्हा शांतपणे बसतात तेव्हा त्यांच्या मनात पुन्हा तोच विचार येतो, तेरा वैभव अमर रहे माँ, हम दिन चार रहें ना रहें… जो काही त्यांच्यावर झालेल्या अन्यायबाबतची त्यांच्या वेदनेचा स्वतंत्र विचार होईल.”

“माझ्या आयुष्यात राजकारणाची थोडी किंवा व्यक्ती समजण्याची थोडी तरी समज असेल, तर खडसे दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाही,” असेही मुनगंटीवारांनी सांगितले. (Sudhir Mungantiwar On Eknath Khadse may join NCP)

“खडसेंचं काम हे विचारासाठी आहेत ते व्यक्तीसाठी काम करत नाही. खडसेंना खूप ऑफर आल्या पण त्यांनी पक्ष सोडलेला नाही. त्यांची व्यक्तीशी श्रद्धा नाही विचाराशी आहे. विचाराची श्रद्धा ही अंबुजा सिंमेटची दिवार तुट सकती है पण विचारांची श्रद्धा ही तुटू शकत नाही. कोरोनामुळे बैठका होत नाही. त्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होतात. हे सर्व नियमित झालं की बैठका होतील. संवादाच्या माध्यामातून प्रश्न सुटतील. खडसे पूर्ण शक्तीने भाजपचा विस्तार हा यापुढेही होईल.”

“मी आताही खडसेंशी बोलणार आहे. आमच्या आधी त्यांनी पक्षासाठी भरपूर काही केलं आहे. त्यांचा त्यागाचा सन्मान आहे. त्यांना मी विनंती करेन की असे विचार मनात आणू नका. खडसे योद्धा आहेत. त्यांनी ऑपरेशन झाल्यानंतरीही जनसेवा थांबवली नाही.  हा पक्ष नाही परिवार आहे. त्यामुळे ते परिवाराचे सदस्य आहे,” असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक

भाजपचा उत्तर महाराष्ट्रातील एक बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. या नेत्याला पक्षात प्रवेश देऊन कोणती जबाबदारी द्यायची? याचा निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यालयात खलबतं सुरु आहेत. त्यामुळे भाजपचा उत्तर महाराष्ट्रातील नेमका कोणता नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार? अशी चर्चा होत असताना, एकनाथ खडसेंचं नाव राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील आणि गुलाबराव देवकर उपस्थित होते. यावेळी एकनाथ खडसे यांना पक्षात प्रवेश देण्याबाबत प्रामुख्याने चर्चा झाली असून पाटील-देवकर यांची मतेही जाणून घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. खडसे पक्षात आल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील बदलणारी गणितं आणि त्याचा पक्षाला होणारा फायदा-तोटा यासह खडसेंना संघटनात्मक जबाबदारी द्यायची की त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करायचा? याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.(Sudhir Mungantiwar On Eknath Khadse may join NCP)

संबंधित बातम्या : 

बडा नेता कोण? दुसरं -तिसरं कोणी नाही, खडसेंचीच राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा

NCP Meeting | जळगावातील भाजप नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर, राष्ट्रवादीची महत्वाच्या बैठकीत रणनीती

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें