AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपची गुंडगिरी, धमक्या, मारामारी खपवून घेतली जाणार नाही, नवाब मलिकांचा भाजपला इशारा

विधानसभेत गुंडगिरी, धमक्या आणि मारामारी करण्याचे काम भाजप करत आहे. हे लोकशाहीला घातक आहे. ही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दात मलिक यांनी भाजपला एकप्रकारे इशाराच दिलाय.

भाजपची गुंडगिरी, धमक्या, मारामारी खपवून घेतली जाणार नाही, नवाब मलिकांचा भाजपला इशारा
नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस
| Edited By: | Updated on: Jul 05, 2021 | 4:34 PM
Share

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात तुफान राडा पाहायला मिळाला. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. जनतेने तीन पक्षांना बहुमत दिले आहे. त्या बहुमताच्या आधारे हे सरकार काम करतेय. मात्र, कधी याला तुरुंगात टाकतो, तर कधी त्याला तुरुंगात टाकू, अशा धमक्या द्यायच्या आणि आता त्यातून काही होत नाही म्हटल्यावर विधानसभेत गुंडगिरी, धमक्या आणि मारामारी करण्याचे काम भाजप करत आहे. हे लोकशाहीला घातक आहे. ही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दात मलिक यांनी भाजपला एकप्रकारे इशाराच दिलाय. (BJP’s bullying will not be tolerated, warns Nawab Malik)

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आज विधानसभेत भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीतील आमदारांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. यावर बोलताना नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी घटना कधी घडली नाही. विशेष म्हणजे या गोष्टी घडत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याचं नेतृत्व करत होते ही दुर्दैवी बाब आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी केलाय.

‘देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचा माईक आणि स्पीकर फोडला’

‘विधानसभेत ओबीसींच्या आरक्षणाबाबत केंद्राकडून इम्पिरियल डाटा मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. त्या प्रस्तावावर विरोधी पक्षाने हरकत उपस्थित केली. त्यामुळे पीठासीन अधिकार्‍यांनी बोलण्याची संधी दिली. त्यानंतर ओबीसी नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुद्देसूद जो घटनाक्रम होता त्याची माहिती दिली. त्यावेळी पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांनी प्रस्ताव मतास टाकल्यानंतर भाजपचे बरेच आमदार पीठासीन अधिकार्‍यांच्या टेबलकडे गेले. त्यांचा माईक उचलला, राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. शिवाय धक्काबुक्कीही केली. यापेक्षा भयानक म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचा माईक आणि स्पीकर फोडला’, असा दावाही मलिक यांनी केलाय.

‘भाजपवाल्यांची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही’

‘अध्यक्षांच्या चेंबरमध्ये अध्यक्ष आणि पीठासीन अधिकारी भास्कर जाधव उपस्थित होते. त्यांच्याजवळ जाऊन भाजपच्या सगळ्या आमदारांनी त्यांना घेरलं. धक्काबुक्की केली, आईबहिणीवरुन शिवीगाळही केली.अशी घटना महाराष्ट्राच्या इतिहासात कधी घडली नव्हती. भाजपवाल्यांना आता गुंडगिरी करून विधानसभेचे कामकाज थांबवायचे असेल तर ते आघाडी सरकार कधीही खपवून घेणार नाही’, अशा स्पष्ट शब्दात नवाब मलिक यांनी भाजपला इशारा दिला आहे.

संबंधित बातम्या :

Breaking : विधानसभेत तुफान राडा; भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन, कोणकोणत्या आमदारांचा समावेश?

स्वप्नीलच्या आईचा व्हिडीओ स्क्रीनवर लावा, त्याच्या कुटुंबीयांना सरकारनं 50 लाख द्यावेत, सुधीर मुनगंटीवार विधानसभेत आक्रमक

BJP’s bullying will not be tolerated, warns Nawab Malik

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.