VIDEO | मला चारचाकी परवडत नाही, चालत जाईन नाहीतर रांगत, शिवेंद्रराजेंच्या ‘दुचाकी’ टीकेवर उदयनराजेंचा भडका

साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातील सुंदोपसुंदी नवीन नाही. एका पक्षात असूनही त्यांच्यातील वैर काही मिटत नाही. सातारा नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे पुन्हा आमनेसामने आले आहेत

VIDEO | मला चारचाकी परवडत नाही, चालत जाईन नाहीतर रांगत, शिवेंद्रराजेंच्या 'दुचाकी' टीकेवर उदयनराजेंचा भडका
शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले


सातारा : दुचाकी चालवण्यावरुन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेल्या टीकेला भाजप खासदार उदयनराजे यांनी उत्तर दिले. मला चारचाकी परवडत नाही, म्हणून मी चालत फिरेन, रांगत जाईन, सीटवर उभा राहून जाईन, तुम्हाला जर वाटत असेल, तर तुम्ही तसे करा, ही लोकशाही आहे, तुम्हाला कोणी अडवलं नाही, असं उत्तर उदयनराजेंनी दिलं.

साताऱ्यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातील सुंदोपसुंदी नवीन नाही. एका पक्षात असूनही त्यांच्यातील वैर काही मिटत नाही. सातारा नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे पुन्हा आमनेसामने आले आहेत. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंना थेट घराण्याची आठवण करुन देत, आपलं घराणं कुठलं, आपण करताय काय? असा सवालच विचारला होता.

उदयनराजे काय म्हणाले?

“मला चारचाकी परवडत नाही, म्हणून मी चालत फिरेन, रांगत जाईन, सीटवर उभा राहून जाईन, तुम्हाला जर वाटत असेल, तर तुम्ही तसे करा, ही लोकशाही आहे, तुम्हाला कोणी अडवलं नाही” असं उदयनराजे म्हणाले. “हिंमत असेल तर समोरासमोर चर्चेला या” असं आव्हान उदयनराजेंनी दिलं. “जनतेची सेवा हाच माझा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. सर्वसामान्य लोकांना राजकारणात येऊ द्या” असं उदयनराजे म्हणाले. “बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला कडेलोट करण्याची शिक्षा हवी” अशी मागणीही उदयनराजेंनी केली.

पाहा व्हिडीओ :

शिवेंद्रराजे काय म्हणाले होते?

उदयनराजेंनी दुचाकी चालवण्यापेक्षा पाच वर्षे सातारची नगरपालिका व्यवस्थित चालवली असती तर एवढी पोस्टरबाजी करण्याची वेळ आली नसती. पोस्टरबाजीवर खर्च करण्यापेक्षा सातारच्या विकासकामांवर खर्च केला असतातर बरं झालं असत. नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने खा. उदयनराजे यांची ही नौटंकी सुरू असल्याचे टोला आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी लगावला होता.

आरोग्यमंत्र्यांचा पत्ता माहिती नव्हता की काय?

खासदार उदयनराजेंनी एकदा आरोग्य मंत्र्यांची भेट घेतली आणि मेडिकल कॉलेजचा प्रश्न सुटला असं नसून मेडिकल कॉलेजसाठी सर्वांनी प्रयत्न केले आहेत. मग 10 वर्षे खासदार असताना आरोग्यमंत्र्यांनी भेट दिली नाही का? की आरोग्यमंत्री यांचा पत्ता माहिती नव्हता, असा खोचक सवालही यावेळी शिवेंद्रराजेंनी विचारला.

आपलं घराणं कुठलं, करताय काय?

सातारा सर्किट हाऊसवर झालेल्या उदयनराजे आणि रामराजे यांच्या भेटीवर बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले, ज्या रामराजेंना दाखवतो आणि बघतोची भाषा केली त्यांच्याशी चर्चा करायला कशाला जायचं. आपलं घराणं कुठलं? छत्रपती घराणे आहे असा खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला.

हे ही वाचा :

आपलं घराणं कुठलं, करताय काय?, बाईक चालविण्यापेक्षा नगरपालिका व्यवस्थित चालवा, शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर वार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI