AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : राज्यात भाजप, शिवसेना युतीचे सरकार; सर्वसामान्यांना न्याय मिळणारच – एकनाथ शिंदे

शुक्रवारपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे. ते पहिल्या दिवशी नाशिकमध्ये (Nashik) पोहोचले तर आज शनिवार आणि रविवार असे दोन दिवस औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर असणार आहेत.

Eknath Shinde : राज्यात भाजप, शिवसेना युतीचे सरकार; सर्वसामान्यांना न्याय मिळणारच - एकनाथ शिंदे
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 30, 2022 | 6:36 AM
Share

नाशिक : शुक्रवारपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे. ते पहिल्या दिवशी नाशिकमध्ये (Nashik) पोहोचले तर आज शनिवार आणि रविवार असे दोन दिवस औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर असणार आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आपल्या दौऱ्यासाठी निवड केलेल्या दोनही शहरांच्या महापालिका निवडणुका येत्या काही दिवसांतच होणार आहेत. या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.  या दौऱ्यामध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, हे सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. विकास करणारे सरकार आहे. शिवसेना भाजप युतीचे हे सरकार निश्चितच सर्वसामान्य जनतेला न्याय मिळून देईल. मी तुमच्या हक्कासाठीच मंत्रालयात बसल्याचेही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. दरम्यान यावेळी नाशिकचे अनेक वर्षांपासून रखडलेली विकास कामे मार्गी लावणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

औरंगाबादमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन

एकनाथ शिंदे हे आज आणि उद्या असे दोन दिवस औरंगाबाद दौऱ्यावर असरणार आहेत. औरंगाबाद हा शिवसेनेचा गड मानला जातो. मात्र आता या गडाला सुरुंग लावण्याची तयारी एकनाथ शिंदे यांनी सुरू केल्याचे चित्र आहे. औरंगाबादमध्ये एकनाथ शिंदे जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. औरंगाबादमधील अनेक शिवसेनेचे पदाधिकारी हे शिंदे गटात सामील झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या औरंगाबाद दौऱ्यानंतर देखील काही शिवसेनेचे पदाधिकारी हे शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.

महापालिका निवडणुकीत युतीची चर्चा

दरम्यान औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी भाजपा आणि शिंदे गटाची युती होणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. विश्वसनीय सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार शिंदे गट आणि भाजपात युतीबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा देखील झाली असल्याची माहिती समोर येत आहे. लवकरच युतीबाबत तसेच जागावाटपांबाबत रणनीती ठरण्याची शक्यता आहे. औरंगाबाद महापालिकेत भाजपा आणि शिंदे गटाची युती झाल्यास शिवसेसमोरी आव्हाने वाढण्याची शक्यता आहे. मात्र अशा युतीने आम्हाला काहीही फरक पडणार नसून, आम्ही औरंगाबादेत स्वबळाची तयारी केल्याचे शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख..
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख...
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?.
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.