VIDEO : बैलांच्या व्हिडीओमुळे पालघर मतदारसंघात धुमाकूळ

पालघर : पालघर लोकसभा निवडणुकीत प्रचाराला वेग आला आहे. पालघरमध्ये युतीकडून शिवसेनेचे राजेंद्र गावित आणि आघाडीकडून हितेंद्र ठाकुरांच्या बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यंदा निवडणुकीत 17 वर्षांनंतर पहिल्यांदाच बविआ शिट्टी ऐवजी रिक्षा या निशाणीवर निवडणूक लढवणार आहे. अटीतटीची लढाई सुरु असतानाच सध्या दोन बैलांच्या झुंजीचा एक व्हिडीओ पालघर जिल्ह्यात सोशल मीडियावर व्हायरल होत […]

VIDEO : बैलांच्या व्हिडीओमुळे पालघर मतदारसंघात धुमाकूळ
सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:00 PM

पालघर : पालघर लोकसभा निवडणुकीत प्रचाराला वेग आला आहे. पालघरमध्ये युतीकडून शिवसेनेचे राजेंद्र गावित आणि आघाडीकडून हितेंद्र ठाकुरांच्या बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यंदा निवडणुकीत 17 वर्षांनंतर पहिल्यांदाच बविआ शिट्टी ऐवजी रिक्षा या निशाणीवर निवडणूक लढवणार आहे. अटीतटीची लढाई सुरु असतानाच सध्या दोन बैलांच्या झुंजीचा एक व्हिडीओ पालघर जिल्ह्यात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दोन बैलांच्या झुंजीत जिंकलेला बैल आम्हीच, असा दावा दोन्ही पक्षाकडून होत आहे. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असणाऱ्या या व्हिडीओमध्ये दोन बैलांची झुंज सुरु आहे. शरीराने अत्यंत ताकदवान असणारा पांढरा बैल आणि त्याच्यापेक्षा कमी ताकद असणारा काळा बैल यांच्यात ही झुंज सुरु आहे. या झुंजीत छोटा आणि कमी ताकदीच्या काळ्या रंगाच्या बैलाने पांढऱ्या बैलाला चांगलीच झुंज दिली. काळ्या बैलाने आपल्या शिंगाच्या सहाय्याने पांढऱ्या बैलाला एका रिक्षावर ढकलले. ही झुंज ऐवढी जबरदस्त होती की, पांढरा बैल रिक्षावर आदळला आणि रिक्षाचा चक्काचुर झाला. या दरम्यान काही लोकांनी हा प्रसंग मोबाईलमध्ये शुट केला आणि त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर केंद्रात, राज्यातील सत्तेतून मोठा झालेल्या महायुतीला आम्ही अशाच प्रकारे रिक्षात कोंबून, आमचा विजय मिळवू असा दावा बविआने केला आहे. तसेच आम्ही जरी घटक पक्ष असलो तरी येथील जनतेची ताकद आमच्यासोबत आहे. त्यामुळे आम्ही काट्याची टक्कर देणारच आणि या बलाढ्य महायुतीच्या उमेदवाराला पळवून लावणारच अशा विश्वासही बविआतर्फे व्यक्त केला जात आहे.

बैलांची झुंज हा जरी गंमतीचा भाग असला तरी मागच्या दोन निवडणुकीत पालघर जिल्ह्यावर भाजपाचा खासदार निवडून आला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही भाजप-सेनेचाच खासदार निवडून येईल हे मुक्या प्राण्यांच्या झुंजीतून समोर येत आहे. वसई, विरारमध्ये बहुजन विकास आघाडी 1990 पासून राज्य करीत आहे. माज्ञ या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा पराभव होईल आणि त्यांच्याच रिक्षात त्यांना कोंबून पळवून लावू असा दावा भाजपकडून केला जात आहे.

दरम्यान सध्या व्हायरल होणाऱ्या या बैलांची झुंज हा जरी राजकीय पक्षातील चर्चेचा विषय ठरत असला, तरी नेटकरी मात्र याचा आनंद घेत आहेत. तसेच या निवडणुकीच्या झुंजीत कोण बाजी मारतय, हे निकालानंतर स्पष्ट होईलच अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

व्हिडीओ :


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें