भाजपमध्ये पंकजा मुंडे दुर्लक्षितच; मराठवाड्यातील पक्षबांधणी मोहिमेतून वगळले; चंद्रकांत पाटलांकडून बैठकांचा सपाटा

मुळात राष्ट्रीय सचिवपद मिळाल्यानंतर पंकजा मुंडे यांचे महाराष्ट्रातील राजकीय वजन वाढायला हवे होते. | Pankaja Munde

भाजपमध्ये पंकजा मुंडे दुर्लक्षितच; मराठवाड्यातील पक्षबांधणी मोहिमेतून वगळले; चंद्रकांत पाटलांकडून बैठकांचा सपाटा

औरंगाबाद: विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपने पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना राष्ट्रीय सचिवपद देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले होते. मात्र, हे राजकीय पुनर्वसन केवळ तोंडदेखलेच आहे की काय, अशी शंका आता येऊ लागली आहे. कारण, भाजपमधील काही नेत्यांकडून अजूनही पंकजा मुंडे यांचे पद्धतशीरपणे पंख छाटण्याचे काम सुरुच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. (Pankaja Munde not happy with Chandrakant Patil strategy in Marathwada)

मुळात राष्ट्रीय सचिवपद मिळाल्यानंतर पंकजा मुंडे यांचे महाराष्ट्रातील राजकीय वजन वाढायला हवे होते. पण राज्य तर सोडाच मराठवाड्यातही पंकजा मुंडे यांना पक्षबांधणीच्या कार्यक्रमापासून दूर ठेवले जात आहे. सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पक्षबांधणीसाठी मराठावाड्यात सक्रिय झाले आहेत. ते एकटेच मराठवाड्यात बैठका घेत आहेत. परंतु, मराठवाड्यात पंकजा मुंडे यांची मोठी राजकीय ताकद असताना त्यांना पक्षबांधणीच्या कार्यक्रमापासून दूर का ठेवले जात आहे, अशी शंका निर्माण झाली आहे.

या सगळ्यावर पंकजा मुंडेही नाराज असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रीय सचिवपदी निवड होऊनही मराठवाड्यातील पक्षबांधणी कार्यक्रमात आपण दुर्लक्षित राहिल्याची बाब पंकजा यांना फारशी रुचलेली नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी आपला नियोजित औरंगाबाद आणि मराठवाडा दौरा पुढे ढकलला होता.

तसेच चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादमध्ये आयोजित केलेल्या बैठकीलाही पंकजा मुंडे उपस्थित राहिल्या नव्हत्या. पंकजा मुंडे यांच्या गटातील नेतेही या बैठकीपासून दूर राहिले नव्हते. मात्र, चंद्रकांत पाटील किंवा इतर नेत्यांकडून त्याची फारशी दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे पंकजा मुंडे भाजपमध्ये अजूनही दुर्लक्षित असल्याची चर्चा नव्याने रंगू लागली आहे.

पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे हे दोन्ही नेते भाजपमध्ये बराच काळापासून नाराज होते. यापैकी एकनाथ खडसे यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यादेखील भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा रंगली होती. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनीसुद्धा भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडेंना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती.

संबंंधित बातम्या:

पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणार का?; संजय राऊत म्हणतात…

‘मी घर बदलणार नाही, आहे तिथेच आहे’, पंकजा मुंडेंकडून पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम

तुम्ही खचू नका, तुमच्या जीवावर मी उभी आहे, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

(Pankaja Munde not happy with Chandrakant Patil strategy in Marathwada)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI