मेधा कुलकर्णींना पदवीधर मतदारसंघाचे तिकीट तरी देणार का? चंद्रकांत पाटील म्हणतात…

पुण्यातून मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देणार का, हे आता अनिश्चित आहे, असं उत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

मेधा कुलकर्णींना पदवीधर मतदारसंघाचे तिकीट तरी देणार का? चंद्रकांत पाटील म्हणतात...
अनिश बेंद्रे

|

Nov 03, 2020 | 4:08 PM

नागपूर : विधानसभेला कोथरुडच्या तत्कालीन भाजप आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांच्या जागी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना तिकीट देण्यात आलं. त्यानंतर कुलकर्णींच्या राजकीय पुनर्वसनाकडे सर्वांचे डोळे लागले होते. मात्र विधानपरिषदेलाही त्यांना डावलण्यात आलं. आता शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत तरी मेधा कुलकर्णी यांना संधी मिळणार का, असा प्रश्न चंद्रकांतदादांना विचारला असता, ते ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत गेले. (Chandrakant Patil answer on Medha Kulkarni’s candidature for Pune Graduate Teacher Vidhan Parishad Constituency Election)

पुण्यातून मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देणार का, हे आता अनिश्चित आहे, असं उत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिलं. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका अचानक जाहीर झाल्या. तयारी झाली नाही, सतरा दिवसात तयारी कशी करणार, यासंदर्भात विचारणा केली आहे, असं पाटील म्हणाले. राज्यातील संघटन मजबूत करण्यासंदर्भात जिल्ह्या-जिल्ह्यात बैठका घेतल्या जात आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

कोल्हापूरमधून निवडून येणार होतात, तर मेधा कुलकर्णी यांचा अधिकार का डावलला? असा खोचक प्रश्न विचारत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना डिवचलं. कोल्हापुरातून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असं चॅलेंज चंद्रकांत पाटलांनी काल दिलं होतं.

“मी आताही कोल्हापुरातून निवडणूक लढवायला तयार आहे. मी जर कोल्हापूरमधून निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन. पुणे हा सुरक्षित मतदारसंघ म्हणून नव्हे, तर पक्षाने आदेश दिल्यामुळे निवडणूक लढवली. माझी कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची तयारी होती.” असं चंद्रकांत पाटील काल म्हणाले होते.

मेधा कुलकर्णी कोण आहेत?

मेधा कुलकर्णी यांनी कोथरुड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. 2014 मध्ये कोथरुडमधून मेधा कुलकर्णींनी शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांच्याविरुद्ध 64 हजार मतांनी विजय मिळवला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचं तिकीट कापून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळे कुलकर्णींचं पुनर्वसन कुठे होणार, याकडे लक्ष लागून राहिलं.

विधानपरिषदेचीही उमेदवारी डावलल्याने आमदार मेधा कुलकर्णी नाराज झाल्या होत्या. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी अनेक वेळा मला विधानपरिषदेवर पाठवणार असल्याचं जाहीर सांगितलं होतं, असं सांगताना मेधा कुलकर्णींना अश्रू अनावर झाले होते. (Chandrakant Patil answer on Medha Kulkarni’s candidature for Pune Graduate Teacher Vidhan Parishad Constituency Election)

मी पक्षाशी बांधील असून कुठे जाणार नाही, मी पक्ष सोडून अक्राळविक्राळ स्वरुप धारण करणार नाही, हाच माझा कमकुवतपणा असेल असं त्यांना वाटत असल्याची शंका मेधा कुलकर्णींनी त्यावेळी व्यक्त केली होती.

संबंधित बातम्या :

आधी विधानसभा, आता विधानपरिषदेला डावललं, मेधा कुलकर्णींच्या डोळ्यात दुसऱ्यांदा पाणी, दादांनी प्रॉमिस मोडल्याचा आरोप

भाजपात संघटनात्मक फेरबदलाचे संकेत, मेधा कुलकर्णी, बावनकुळेंना नवी जबाबदारी?

(Chandrakant Patil answer on Medha Kulkarni’s candidature for Pune Graduate Teacher Vidhan Parishad Constituency Election)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें