हर्षवर्धन जाधव हे **** आहेत, चंद्रकांत खैरे यांची जहरी टीका

औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant khaire criticism on harshwardhan jadhav) यांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर जहरी टीका केली आहे.

हर्षवर्धन जाधव हे **** आहेत, चंद्रकांत खैरे यांची जहरी टीका

औरंगाबाद : औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant khaire criticism on harshwardhan jadhav) यांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर जहरी टीका केली आहे. हर्षवर्धन जाधव हे नीच आहेत, असं म्हणत खैरे यांनी जाधव यांना लक्ष्य केलं. नुकतेच हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांची जीभ घसरली होती. त्यामुळे शिवसैनिकांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर संताप व्यक्त केला होता. मात्र या टीकेला उत्तर देताना खैरेंनीही अर्वाच्य भाषेत जाधव यांच्यावर टीका (Chandrakant khaire criticism on harshwardhan jadhav) केली आहे.

चंद्रकांत खैरे म्हणाले, “हर्षवर्धन जाधव यांनी भगवा झेंडा खाली खेचला आणि त्या ठिकाणी हिरवा झेंडा लावला, मग उद्धव ठाकरे काय चुकीचं म्हटले. एमआयएमसोबत मैत्री करुन हर्षवर्धन यांनी शिवसेनेला हरवण्याचे काम केले. हा किती नीच आहे. हे इथल्या मतदारांना माहिती नव्हते. आता त्यांना माहित पडले असेल.”

“हर्षवर्धन यांनी घरातही आई, भावाला आणि बायकोला मारहाण केली आहे. वडिलांनाही त्याने बैठकीत सर्वांसमोर मारले होते. हे असे चाळे करणारे काही उपयोगाचे नाही. याला खरतर वेड्याच्या रुग्णालयात दाखल केले पाहिजे”, असंही खैरे म्हणाले.

“जाधवांनी जे वक्तव्य केलं आहे ना त्यामुळे जनता चिडलेली आहे. तसेच शिवसैनिकही चिडलेले आहेत. त्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे करणार आहे. त्याला निवडणुकीतूनही बाद केले पाहिजे”, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.

दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आर्वाच्य भाषेत टीका केल्यामुळे राज्यातून शिवसैनिक संताप व्यक्त करत आहेत. निवडणूक आयोगाने हर्षवर्धन जाधव यांच्यावर कडक कारवाई करावी अशी तक्रारही राज्यातील पोलीस स्टेशनमध्ये सध्या दाखल केली जात आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?

“जर आपली लोकं शिवसेनेची असतील, भाजपची असतील, चुका झाल्या तर कान खेचा, मीही त्यांचे कान उपटल्याशिवाय राहणार नाही. मी कन्नडमध्ये सभेला गेलो होतो. तेथेही मी हेच बोललो. कन्नडमधील एक विश्वासघातकी, ज्यानं भगवा उतरविण्यामध्ये हिरव्याची साथ दिली होती. त्याला आता अजिबात माफ करणार नाही. चुकतोय, लहान आहे म्हणून मी गेल्या 5 वर्षे त्याच्या चुका पोटात घालत होतो. पण भगव्याशी हरामखोरी मी सहन करु शकत नाही”, असे उद्धव ठाकरें हर्षवर्धन जाधव यांच्याबद्दल बोलले होते.

काय म्हणाले होते हर्षवर्धन जाधव ?

“जर मी निवडणूक लढवून मुस्लीम उमेदवाराला मदत केल्याचा तुम्हाला राग आला, तर मग अब्दुल सत्तार तुमचा कोण? अब्दुल सत्तार तुमचा पाहुणा आहे का?” असे म्हणत जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *