AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘येवलेकरांनो तुमच्यात रमलो मी असा’, छगन भुजबळ दोषमुक्त ठरल्यानंतर खास कविता व्हायरल

छगन भुजबळ यांना दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. त्यानंतर छगन भुजबळांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली. सत्य परेशान हो सकता हैं, पराजित नहीं, असं भुजबळांनी म्हटलंय. दरम्यान भुजबळांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर एक कविता शेअर केली जात आहे.

'येवलेकरांनो तुमच्यात रमलो मी असा', छगन भुजबळ दोषमुक्त ठरल्यानंतर खास कविता व्हायरल
Chhagan Bhujbal
| Edited By: | Updated on: Sep 09, 2021 | 6:10 PM
Share

नाशिक : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. छगन भुजबळ यांना दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. त्यानंतर छगन भुजबळांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली. सत्य परेशान हो सकता हैं, पराजित नहीं, असं भुजबळांनी म्हटलंय. दरम्यान भुजबळांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर एक कविता शेअर केली जात आहे. येवल्यातील सुषमा पैठणकर यांची शब्दरचना असलेली ही कविता भुजबळ समर्थकांच्या पसंतीला उतरत आहे. (Clean chit to Chhagan Bhujbal in Maharashtra Sadan scam)

होय… मी छगन भुजबळ बोलतोय…!

कुणास ठाऊक कसा पण येवलेकरांनो तुमच्यात रमलो मी असा…!

2004 साली मी येवल्यात आलो, दुष्काळी जनतेला बघुन कुठतरी मी ही हळवा झालो, घेतला ध्यास करेन येवल्याचा विकास. समस्या होती पाण्याची, रस्ते, विजप्रश्न मात्र सोडविण्याची… कुणास ठाऊक कसा पण येवलेकरांनो तुमच्यात रमलो मी असा..!!

व्रत होते समाजसेवेचे, येवल्याच्या भुमीत काही तरी पेरण्याचे, स्वप्न होते मांजरपाड्याचे, गुजरातकडे वाहून जाणारे पाणी नाशिककडे वळविण्याचे…. कुणास ठाऊक कसा पण येवलेकरांनो तुमच्यात रमलो मी असा..!!

बोलता बोलता पंधरा वर्ष झाली. संकटातही मात्र येवलेकरांनी साथ नाही सोडली,पक्ष नाही सोडला, आता तर मात्र भुमिपुत्राचा मुद्दाही येवलेकरांनी खोडला…. कुणास ठाऊक कसा पण येवलेकरांनो तुमच्यात रमलो मी असा..!!

जातीपातीच राजकारण मी नाही केलं,शाहू फुले अंबेडकरांच्या विचारांना मी जपलं, न्याय बंधु समतेचे धडे मी शिकलोय, माझ्या ओ.बी.सी.बांधवांसाठी मात्र सदैव मी झटलोय…. कुणास ठाऊक कसा पण येवलेकरांनो तुमच्यात रमलो मी असा..!!

वाटले होते कधी तरी संपलो मी, हारलो मी ,खेळ नियतीचा येवल्याच्या मातीत पुन्हा जन्मला आलो मी, पुर्वपुण्याई थोर तळागाळातील जनतेचा मायबाप होवुन मात्र धन्य झालो मी…. कुणास ठाऊक कसा पण येवलेकरांनो तुमच्यात रमलो मी असा..!!

अख्खा महाराष्ट्र माझी कर्मभुमी, त्यात येवलेकर मात्र वेगळ्या स्थानी, नाही मी घाबरत तुरूंगवासाला, आरे येवलेकरांनो तुमचे आशीर्वाद घेवून मात्र उतरत राहिन मी न्यायदेवतेच्या परीक्षेला…. कुणास ठाऊक कसा पण येवलेकरांनो तुमच्यात रमलो मी असा..!!

चारही दिशा पिंजून काढल्या, देशात फिरलो, महाराष्ट्रात राहिलो, मुंबई गाठली, नाशिक खेटल,पण येवले करांसारख प्रेम मात्र कुठच नाही पाहिलं…. कुणास ठाऊक कसा पण येवलेकरांनो तुमच्यात रमलो मी असा..!!

सगळी पदे मी उपभोगलो मुंबई चा मी महापौर झालो, नाशिक चा पालक मंत्री झालो, महाराष्ट्राचा मंत्री ही झालो पण येवल्याच्या आमदारकीत मात्र मी सुखावलो…. कुणास ठाऊक कसा पण येवलेकरांनो तुमच्यात रमलो मी असा..!!

किती करता प्रेम माझ्यावर, आता मी भारावलोय, आयुष्य किती असेल माहित नाही, पण शेवटचा श्वास सुध्दा तुम्हाला मी देईन, एवढ मात्र खात्रीने सांगतोय…. कुणास ठाऊक कसा पण येवलेकरांनो तुमच्यात रमलो मी असा..!!

आपला नेता मा.छगनरावजी भुजबळ

इतर बातम्या :

साज़िशें लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने की, कोर्टाच्या निकालानंतर छगन भुजबळांचा शायराना अंदाज

छगन भुजबळ यांना सर्वात मोठा दिलासा, महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील सर्व आरोपातून मुक्तता!

Clean chit to Chhagan Bhujbal in Maharashtra Sadan scam

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.