AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explainer : या 5 कारणांमुळे छगन भुजबळ राष्ट्रवादीत अस्वस्थ; खरोखरच वेगळा निर्णय घेणार?

राष्ट्रवादीत सध्या मोठ्या प्रमाणावर धुसफूस सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही धुसफूस समोर आली आहे. या विस्तारातून छगन भुजबळ यांना वगळण्यात आलं आहे. त्यामुळे भुजबळ भडकले आहेत. मी काय तुमच्या हातातील खेळणी आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे. भुजबळ नाराज होण्यामागे पाच महत्त्वाची कारणे आहेत. कोणती आहेत ही कारणे?

Explainer : या 5 कारणांमुळे छगन भुजबळ राष्ट्रवादीत अस्वस्थ; खरोखरच वेगळा निर्णय घेणार?
Chhagan BhujbalImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 18, 2024 | 1:10 PM
Share

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे छगन भुजबळ नाराज झाले आहे. जहां नही चैना, वहां नही रहेना, असं म्हणत छगन भुजबळ यांनी आपल्या अस्वस्थतेला वाट मोकळी करून दिली आहे. त्यामुळे भुजबळ राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार का? अशी चर्चा रंगली आहे. भुजबळ यांनी नागपूर अधिवेशन सोडून तडक नाशिक गाठून आपल्या समर्थकांशी चर्चा सुरू केल्याने भुजबळ पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. छगन भुजबळ नेमके नाराज का झाले? फक्त मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाराज आहेत का? कोणती अशी कारणं आहेत ज्यामुळे भुजबळ नाराज झाले? याचाच घेतलेला हा आढावा.

राज्यसभेला पाठवलं नाही

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर छगन भुजबळ हे अजित पवार यांच्यासोबत राहिले. त्यानंतर राज्यसभेची निवडणूक लागली. राष्ट्रवादीकडून दोन उमेदवार राज्यसभेवर जाणार होते. त्यामुळे भुजबळ यांनीही राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, अजित पवार यांनी त्यांची पत्नी आणि लोकसभा निवडणूकीत पडलेल्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवलं. दुसऱ्या जागेवर नितीन पाटील यांना पाठवलं. नितीन पाटील यांना अजित पवार यांनी शब्द दिला होता, त्यामुळे पाटील यांना राज्यसभेत पाठवलं. त्यामुळे भुजबळ नाराज झाले होते.

लोकसभेची तयारी केली अन्…

भुजबळांचं नाराज होण्याचं दुसरं कारण म्हणजे त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचे पक्षाने आदेश दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी भुजबळांना नाशिकमधून लोकसभेवर निवडून आणा असे आदेश दिले. त्यामुळे तुम्हाला लोकसभा लढवावी लागेल, असं अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी भुजबळांना सांगितलं. तसा दावा भुजबळांनी केला आहे. सुनील तटकरे यांनीही हे मान्य केलं आहे. भुजबळांनी लोकसभेची तयारीही केली. पण महिना झाला तरी त्यांच्या नावाची घोषणा होत नव्हती. इतरांचे नाव घोषित होत होते, पण भुजबळांची उमेदवारी जाहीर होत नव्हती. याबाबत भुजबळांनी नेत्यांना विचारणा केली. पण त्यांना उत्तर मिळत नव्हते. त्यामुळे निराश झालेल्या भुजबळांनी लोकसभा लढणार नसल्याचं जाहीर केलं.

उभे राहा, राजीनामा द्या

भुजबळ आणखी एका कारणाने प्रचंड दुखावले गेले. त्यांना येवल्यातून विधानसभा लढवण्यास सांगितलं. भुजबळ लढण्यास फारसे इच्छुक नव्हते. पण तुमच्याशिवाय येवला नाही. त्यामुळे तुम्ही लढा असं सांगितलं. भुजबळ लढले. निवडूनही आले. पण आता त्यांना परत राजीनामा द्यायला सांगितलं आहे. तुम्ही विधानसभेचा राजीनामा द्या. कारण नितीन पाटील यांचे भाऊ मकरंद पाटील यांना निवडून आणायचे आहे. मकरंद यांना मंत्री करायचं आहे, असं भुजबळांना सांगितलं.

तसेच तुम्ही राजीनामा द्या. त्यानंतर नितीन पाटील यांचा राजीनामा घेऊन तुम्हाला राज्यसभेवर पाठवू, असंही त्यांना सांगितलं. त्यावर भुजबळ भडकले. मी आताच निवडून आलो आहे. आता राजीनामा दिला तर माझ्या मतदारांशी ती प्रतारणा ठरेल. त्यांना काय वाटेल? असं सांगत मी राजीनामा देणार नाही. हवं तर एक दोन वर्षानंतर राज्यसभेचं बघू, असं भुजबळ यांनी सांगितलं. या प्रकारामुळे आपल्याला पक्ष खेळणी समजत असल्याची भावना भुजबळ यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळेच ते नाराज आहेत.

मंत्रिपद नाकारलं…

छगन भुजबळ हे सीनियर नेते आहेत. ते मंत्रिमंडळात हवेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना सांगितलं. त्यानंतरही भुजबळ यांचा पत्ताकट करण्यात आल्याने भुजबळ दुखावले आहेत. मकरंद पाटील यांना मंत्री करण्यासाठीच भुजबळ यांचा पत्ताकट केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेही भुजबळ नाराज झाले आहेत.

निर्णय प्रक्रियेत नाही

अजित पवार हे आपल्याला कोणत्याही निर्णय प्रक्रियेत घेत नसल्याचा आरोप भुजबळ यांनी केला आहे. अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हेच सर्व निर्णय घेत असतात. मला विचारतही नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. राष्ट्रवादीत जेव्हा बंड झालं, अजितदादांनी जेव्हा वेगळा निर्णय घेतला, त्याची कल्पनाही मला नव्हती. पण सर्व एकाबाजूने गेले म्हणून मीही त्यांच्या बाजूने राहिलो, अशी खदखदही त्यांनी व्यक्त केली आहे. या पाच कारणांमुळे भुजबळ पक्षात नाराज आहेत. जिथे समाधान नाही, तिथे राहायचं नाही, असं सूचक विधानही ते वारंवार करणार आहेत. त्यामुळे भुजबळ खरोखरच वेगळा निर्णय घेणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.