AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘खोटं बोलणारी लोकं बाळासाहेबांना आवडत नव्हती, म्हणून अशा लोकांना त्यांनी पक्षातून काढलं’, उद्धव ठाकरेंचा पलटवार

व्यासपीठावरुन बोलताना नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला. राणे यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला. तर उद्धव ठाकरे यांनी राणेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं.

'खोटं बोलणारी लोकं बाळासाहेबांना आवडत नव्हती, म्हणून अशा लोकांना त्यांनी पक्षातून काढलं', उद्धव ठाकरेंचा पलटवार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Edited By: | Updated on: Oct 09, 2021 | 2:52 PM
Share

सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले आहेत. तब्बल 16 वर्षांनी हे दोन्ही नेते एकत्र पाहयाला मिळाली. मात्र यावेळी नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वैर पुन्हा एकदा पाहायला मिळालं. इतकंच नाही तर व्यासपीठावरुन बोलताना नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला. राणे यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला. तर उद्धव ठाकरे यांनी राणेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. (CM Uddhav Thackeray’s reply to Narayan Rane’s allegations)

विनायक राऊतांचा मला अभिमान- मुख्यमंत्री

नारायण राणे यांच्या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. नारायणराव आपण म्हता ते खरं आहे. तुम्ही जी विकासकामं केली त्यात तुमचं योगदान नक्की आहे. त्याबद्दल तुमचे धन्यवाद नक्की देतो. पण कोकणची जनता डोळे मिटून कधीच राहत नाही. ती शांत आहे, संयमी आहे. म्हणून सदासर्वदा भयभीत होऊन ती काही करेल असं अजिबात नाही, ती मर्द आहे. म्हणूनच त्या जनतेनं तिच्या हक्काचा लोकप्रतिनिधी अनेक वर्षांपासून निवडून दिला आहे. म्हणून खासदार विनायक राऊत यांचा मला अभिमान आहे. हे ही खरं आहे की, बाळासाहेबांना खोटं बोलणारी लोकं आवडत नव्हती. म्हणूनच अशी खोटं बोलणारी लोकं त्यांनी शिवसेनेतून काढून टाकली होती, हा सुद्धा इतिहास आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंवर पलटवार केलाय.

‘मी विकासकामात कोतेपणा आणत नाही’

‘आपण केंद्रात मंत्री आहात. लघू का असेना सुक्ष्म का असेना पण मोठं खातं आहे त्याचा उपयोग महाराष्ट्राला नक्की करुन द्याल ही तुमच्याकडून मला अपेक्षा आहे. मी कुठेही पक्षभेद आणत नाही. तुमच्या कॉलेजच्या बाबतीत जेव्हा फोन केला तेव्हा दुसऱ्याच क्षणी मी सही केली. विकासाच्या कामात मी कोतेपणा आणू इच्छित नाही. पण पेड्यातला गोडेपणा अंगी बाळगावा लागतात. म्हणून तिळगूळ घ्या गोड बोला असं म्हणतात. मला बोलायचं नाही. मला बोलावं लागला. आजचा कार्यक्रम कोकणसाठी महत्त्वाचा आहे. सगळे मिळून काम करु’, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

नारायण राणेंचा विनायक राऊतांवर गंभीर आरोप

नारायण राणे यांनी आपल्या भाषणात शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. राऊत यांनी चिपी विमानतळासह जिल्ह्यातील अनेक विकासकामात अडथळा निर्माण केल्याचा गंभीर आरोप केला. तसंच राऊत यांनी सुभाष देसाई यांचा उल्लेख चिपी विमानतळाचे मालक असा केला. त्यावर बोलताना राणेंनी ‘मला आज कळलं विमानतळाचे मालक कोण? म्हसकर गेले आणि दुसरे आले. विनायक राऊतांनी स्टेजवरुन सांगितलं. विमानतळ काय देसाई कंपनीचं आहे काय? बाळासाहेबांना खोटं बोलणं कधीच आवडलं नाही. खोटं बोलणाऱ्यांना साहेबांकडे थारा नव्हता. तुम्हाला मिळणारी माहिती खरी नाही’, असं राणे म्हणाले.

इतर बातम्या :

‘जे इन्फ्रास्ट्रक्चर दिसतंय त्यात राणेंचं योगदान, दुसरा कुणी इथं येऊच शकत नाही’, उद्धव ठाकरेंसमोर राणेंचा हल्लाबोल

Photo : चिपी विमानतळ उद्घाटन सोहळा, नारायण राणेंसह भाजप शिवसेनेचे सर्व नेते एकाच विमानातून मुंबईहून रवाना

CM Uddhav Thackeray’s reply to Narayan Rane’s allegations

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.