Marathi News » Photo gallery » Chipi Airport BJP and Shivsena leaders, including Union Minister Narayan Rane, fly in the same plane for the inauguration of Chipi Airport
Photo : चिपी विमानतळ उद्घाटन सोहळा, नारायण राणेंसह भाजप शिवसेनेचे सर्व नेते एकाच विमानातून मुंबईहून रवाना
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचं उद्घाटन आज पार पडणार आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. शिंदे या कार्यक्रमासाठी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित राहणार आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
Oct 09, 2021 | 1:01 PM
या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारी विमानाने चिपी विमानतळावर दाखल झाले आहेत. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह भाजप आणि शिवसेनेचे नेतेही एकाच विमानाने मुंबईहून चिपी विमानतळाकडे रवाना झाले आहेत.
1 / 5
तत्पूर्वी मुंबई विमानतळावर भाजप आणि महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी चहापाणी आणि गप्पांचा फड रंगल्याचं या फोटोतून पाहायला मिळत आहे.
2 / 5
विमानाद्वारे मुंबईहून चिपीकडे रवाना होण्यापूर्वी भाजपचे आमदार प्रसाद लाड, रविंद्र चव्हाण यांच्यासह भाजप नेत्यांनी विमानासमोर भाजपचा झेंडा फडकावला. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील वाद या रुपाने पुन्हा एकदा पाहायला मिळाला.
3 / 5
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह भाजपचे नेते आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकाच विमानातून प्रवास केला. त्यात शिवसेनेचे मंत्री आणि खासदारांचाही समावेश होता.
4 / 5
सुनील प्रभू, अनिल देसाई, आदिती तटकरे, अनिल परब, दादा भुसे, अरविंद सावंत, सुभाष देसाई, विनायक राऊत असे महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी एकाच विमानातून प्रवास केला. त्यात भाजपचे नेते प्रसाद लाड, रविंद्र चव्हाणही उपस्थित होते.