झारखंडमध्ये ‘सोरेन’ सरकार, शपथविधीला देशभरातील विरोधीपक्षांचं शक्तीप्रदर्शन

झारखंड विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-आरजेडी आघाडीचे नेता हेमंत सोरेन (Hemant Soren swearing ceremony) यांनी आज (29 डिसेंबर) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

झारखंडमध्ये 'सोरेन' सरकार, शपथविधीला देशभरातील विरोधीपक्षांचं शक्तीप्रदर्शन
सचिन पाटील

| Edited By:

Dec 29, 2019 | 6:07 PM

रांची : झारखंड विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-आरजेडी आघाडीचे नेता हेमंत सोरेन (Hemant Soren swearing ceremony) यांनी आज (29 डिसेंबर) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रांची येथील मोरहाबादी मैदानात हा शपथविधी सोहळा पार पडला. यासह सोरेन राज्याचे 11 वे मुख्यमंत्री बनले आहेत. राज्यपाल द्रौपदी मुर्मूने यांनी सोरेन यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ (Hemant Soren swearing ceremony) दिली.

सोरेन यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार रामेश्वर उरांव, विधीमंडळ नेते आलमगीर आलम, आरजेडीचे एकमेव आमदार सत्यानंद भोक्ता यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. 14 जानेवारी रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेमंत सोरेन यांच्या शपथविधी सोहळ्याला देशातील अनेक दिग्गज नेते आणि उद्योगपती उपस्थित होते. दरम्यान, शनिवारी (28 डिसेंबर) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही रांची येथे पोहोचल्या. सोरेन यांनी ममता बॅनर्जींच्या पाया पडून त्यांचे स्वागत केले.

शपथविधी सोहळ्यावेळी मंचावर माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या शिवाय भाजप व्यतिरिक्त इतर पक्षातील नेतेही उपस्थित होते. यावेळी हेमंत सोरेन यांचे वडील शिबू सोरेम, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, काँग्रेस नेता राहुल गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, डीएमके नेता एम. के. स्टॅलिन, बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझीसह अनेक बडे नेते उपस्थित होते.

दुसऱ्यांदा सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री बदले आहेत. आजच्या दिवशी झारखंडच्या नव्या निर्माणचा संकल्प दिसव म्हणून म्हटलं आहे. शपथविधीपूर्वी सोरेन यांनी झारखंडच्या सव्वा तीन कोटी जनतेला मोरहाबादी मैदानात या आणि या क्षणाचे साक्षीदार व्हा, असं आवाहन त्यांनी जनतेला केले होते.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें