आधी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची अडीच तास बैठक, मग तासभर मुख्यमंत्र्यांची पोलीस महासंचालकांशी चर्चा

ही बैठक नेमकी कोणत्या कारणासाठी आयोजित केली आहे, हे अद्याप समोर आलेले (CM Uddhav Thackeray Ajit pawar Maha vikas aghadi Meeting) नाही. 

आधी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची अडीच तास बैठक, मग तासभर मुख्यमंत्र्यांची पोलीस महासंचालकांशी चर्चा

मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, लॉकडाऊन, त्यातच अनेक राजकीय कुरघोडी सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात अडीच तास बैठक झाली. या बैठकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल परब देखील उपस्थित होते. शिवाजी पार्क जवळील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात ही बैठक सुरु होती.  (CM Uddhav Thackeray Ajit pawar Maha vikas aghadi Meeting)

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यात जवळपास अडीच तास ही बैठक पार पडली.  संध्याकाळी 6.30 च्या सुमारास सुरु झालेली ही बैठक रात्री 9.00 च्या सुमारास संपली.

या बैठकीत शिवसेनेच्या पारनेरच्या नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेश, पोलिस उपायुक्तांच्या बदल्या आणि स्थगिती, तसंच कोरोना लॉकडाऊन संदर्भातल्या सरकारचे धोरण वरून महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक संपवून गृहमंत्री अनिल देशमुख बैठकीतून बाहेर पडल्यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल मुख्यमंत्र्यांकडे बैठकीला पोहचले. त्यानंतर पुढील तासभर राज्य पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत बैठक झाली. ही बैठक 9.40 ला संपली.

दरम्यान काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. महाविकासआघाडीच्या सत्तास्थापनेनंतर शरद पवार मातोश्रीवर जाण्याची ही दुसरी वेळ होती. पोलिसांच्या बदल्या आणि पारनेरमध्ये शिवसेनेचे नगरसेवक फोडल्याचं एक कारण यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज आहेत. त्यामुळे शरद पवार यांना मातोश्रीवर यावं लागल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही पाहा : TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज! 

मुंबई पोलीस दलातील बदल्या, पारनेरमधील नगरसेवकांची फोडाफोडी, सहकारी पक्षांमधील समन्वय, अधिकाऱ्यांची मर्जी आणि मर्जीतील अधिकारी अशा विविध मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत धुसफूस आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची आहे.

मुंबई पोलीस दलातील 12 उपायुक्तांची दोन जुलैला बदली करण्यात आली होती. मात्र या बदल्यांना मुख्यमंत्री आणि गृह मंत्रालय कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार, अनिल देशमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर शरद पवार हे ‘मातोश्री’वर जाण्याची ही केवळ दुसरीच वेळ होती. पोलिसांच्या बदल्या आणि पारनेरमध्ये शिवसेनेचे नगरसेवक फोडल्याचं एक कारण यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज आहेत. त्यामुळे शरद पवार यांना ‘मातोश्री’वर यावं लागल्याचं सांगण्यात येत आहे. (CM Uddhav Thackeray Ajit pawar Maha vikas aghadi Meeting)

संबंधित बातम्या : 

शरद पवार-अनिल देशमुख मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, ‘मातोश्री’वर खलबतं

…. म्हणून शरद पवारांना दुसऱ्यांदा ‘मातोश्री’वर जाण्याची वेळ?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *