कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे मारता, मग देशात घोषित आणीबाणी आहे का? : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी शेतकरी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत मग देशात घोषित आणीबाणी आहे का? असा सवाल उपस्थित केला.

कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे मारता, मग देशात घोषित आणीबाणी आहे का? : उद्धव ठाकरे


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत सरकारच्या कामाची माहिती दिली. यावेळी त्यांनी भाजपसह विरोधी पक्षांवरही निशाणा साधला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप केला. याला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी शेतकरी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत मग देशात घोषित आणीबाणी आहे का? असा सवाल उपस्थित केला (CM Uddhav Thackeray criticize BJP and Modi Government over Farmer Protest ).

उद्धव ठाकरे म्हणाले, “जनतेच्या मताचा विचार केला तर जनतेच्या मनात अशी कोणतीही भावना नाही. जर राज्यात अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का? शेतकरी दिल्लीच्या सीमेवर त्यांच्या न्याय हक्कासाठी ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्याशी नीट बोलणं, त्यांच्या भावना समजून घेणं या गोष्टी तर सोडाच पण भर थंडीत शेतकऱ्यांना उघड्यावर बसावं लागतंय. त्यांच्यावर थंडगार पाण्याचे फवारे मारले जात आहेत. हे काही सद्भावनेचं लक्षण नाही. जर याची व्याख्याच त्यांना बदलायची असेल तर ते बदलू शकतात.”

“भाजपचं मागील 1 वर्ष सरकार कधी पडणार याचे मुहुर्त काढण्यातच गेलं”

“भाजपचं मागील वर्ष सरकार कधी पडतंय आणि कधी पडणार याचे मुहुर्त काढत बसण्यात गेले आहेत. त्यामुळे सरकारने काय काय कामं केलीत हे त्यांनी पाहिलंच नसेल. सरकारने मागील वर्षभरात काय कामं केलीत याची पुस्तिका नुकतीच महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवली. जनतेत कुठंही सरकारबद्दल नाराजी किंवा असमाधान असल्याचा सूर नाही. विरोधी पक्षांच्या नावातच विरोधी आहे त्यामुळे त्यांना विरोधी या शब्दाला जागावं लागतं. त्यामुळे ते जे काही म्हणताय ते त्यांच्यापुरतं बरोबर आहे,” असंही मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :

  • राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नियुक्तींसाठी मर्यादा हवी, आमदार निवृत्त होण्याची जशी मर्यादा आहे, तसं त्यांची नेमणूक होण्यावरही मर्यादा हवी, त्यासाठी घटनेत दुरुस्ती करण्याची गरज आहे, उद्याच्या अधिवेशनात या १२ जागा रिक्तच राहणार आहेत
  • भाजप सरकार असहिष्णू असल्याचा आरोप करतंय, पण तसं असतं तर महाविकास आघाडीचे उमेदवार एवढ्या मोठ्या प्रमाणात निवडून आले असते का?
  • निवडणुकीत भाजपचे 50 वर्षांचे बालेकिल्ले ढासाळले
  • 28 हजार कोटी अजूनही मिळाले नाही, येणाऱ्या रकमेचा ताळमेळ नाही, वन मिशन, वन टॅक्स पाळलं जात नाही
  • देवेंद्र फडणवीसांचा चेहरा पडलेला, पत्रकार परिषदेत उत्साह नव्हता, स्थानिक संस्थांचा निवडणूक लागल्यानंतर ते डिमोरलाईज झाले आहेत

हेही वाचा :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा ‘सिंहासन’ बदलतात

बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक कधी होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात…

औरंगाबादचा विकास वेगाने होणार; मला विकास कामे करण्याची घाई: उद्धव ठाकरे

व्हिडीओ पाहा :

CM Uddhav Thackeray criticize BJP and Modi Government over Farmer Protest

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI