AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जे पृथ्वीबाबा, फडणवीसांना जमलं नाही, ते ठाकरेंनी करुन दाखवलं, एकाचवेळी 300 ‘पॉवरफुल्ल’ अधिकाऱ्यांना झटका

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) किंवा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही जे जमू शकलं नव्हतं, ते उद्धव ठाकरेंनी करुन दाखवलं. मंत्रालयात वर्षानुवर्षे एकाच जागी, ठाण मांडून बसलेल्या तब्बल 300 अधिकाऱ्यांची फेरबदल केली आहे.

जे पृथ्वीबाबा, फडणवीसांना जमलं नाही, ते ठाकरेंनी करुन दाखवलं, एकाचवेळी 300 'पॉवरफुल्ल' अधिकाऱ्यांना झटका
cm-uddhav-thackeray-with-mantralay-photo
| Edited By: | Updated on: Sep 02, 2021 | 9:47 AM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मंत्रालयातील ‘अशक्यप्राय’ वाटणारी गोष्ट करुन दाखवली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) किंवा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही जे जमू शकलं नव्हतं, ते उद्धव ठाकरेंनी करुन दाखवलं. मंत्रालयात वर्षानुवर्षे एकाच जागी, ठाण मांडून बसलेल्या तब्बल 300 अधिकाऱ्यांची फेरबदली केली आहे. हे अधिकारी अनेक वर्ष एकाच विभागात तळ ठोकून होते. त्यामुळे एखाद्या सचिवापेक्षाही जास्त ‘पॉवर’ हे अधिकारी दाखवत होते. टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील 300 अधिकाऱ्यांची फेरबदल केली. मंत्रालयातील अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात तळ ठोकून होते. ते केवळ खात्यांचे सचिवच नव्हे तर कॅबिनेट सदस्यांपेक्षाही अधिक प्रभावशाली झाले होते. कोणतेही कॅबिनेट सदस्य त्यांना बदलू शकत नव्हते. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर ते प्रशासनाच्या निदर्शनास आणण्यात आले. `प्रदीर्घ विचारानंतर, मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करून मंत्रालयातील 300 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली.

पृथ्वीराज चव्हाण, फडणवीसांचे प्रयत्न अयशस्वी

यापूर्वी, देवेंद्र फडणवीस आणि पृथ्वीराज चव्हाण यांसारख्या माजी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांमध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यात ते यशस्वी झाले नव्हते. मात्र आता उद्धव ठाकरे यांनी करुन दाखवलं आहे. त्यासाठी उद्धव ठाकरेंना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी महत्त्वाची मदत केल्याचं सांगण्यात येत आहे.

सचिवांपेक्षा अधिकारी पॉवरफुल्ल

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “एकाच कक्षात वर्षानुवर्षे बसलेले अधिकारी ‘पॉवरफुल्ल’ बनले होते. कोणताही कॅबिनेट सदस्या त्यांचं काही ‘वाकडं’ करु शकत नव्हता. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं, तेव्हा ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली. मग विचारमंथन करुन, या 300 अधिकाऱ्यांमध्ये फेरबदल करण्यात आला. त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करण्यात आली”

आम्हाला आशा आहे की गेल्या दोन दिवसात जारी केलेले सर्व हस्तांतरण आणि पदोन्नती आदेश लागू केले जातील. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या नेतृत्वाखालील मुख्यमंत्री आणि सामान्य प्रशासन विभागासाठी ही खरी कसोटीची वेळ असेल, असंही या अधिकाऱ्याने सांगितलं.

संबंधित बातम्या 

12 आमदार नियुक्ती वाद, राष्ट्रवादीने यादी बदलल्याची चर्चा, राजू शेट्टींचं नाव वगळलं?  

अनिल देशमुख यांच्या वकिलाला सीबीआयची अटक, तपासावर परिणाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.