जे जे करता येईल ते करू, मुंबईत काम सुरू, मदतीचा निर्णय लवकरच: उद्धव ठाकरे

जे जे करता येईल ते करू सवंग लोकप्रियता व टाळ्यांसाठी घोषणा करणारा मी नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.  CM Uddhav Thackeray said we will immediately take decision of compensation for farmers

जे जे करता येईल ते करू, मुंबईत काम सुरू, मदतीचा निर्णय लवकरच: उद्धव ठाकरे

उस्मानाबाद : अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आहे. घरे वाहून गेली ही माहिती अतिवृष्टी होताना प्रत्येक मिनिटाला घेतली होती. पावसादरम्यान कमीत कमी जीवितहानी व्हावी यासाठी उपाययोजना राबविण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. मुंबईत काम सुरू असून आज उद्यापर्यंत मदतीचा निर्णय होईल. जे जे करता येईल ते करू सवंग लोकप्रियता व टाळ्यांसाठी घोषणा करणारा मी नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (CM Uddhav Thackeray said we will immediately take decision of compensation for farmers)

शेतकऱ्याला मदत केल्याशिवाय सरकार राहणार नाही. नुकसान व रक्कम याचा आढावा सुरू आहे.जनता व शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्या टिकेकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

सरकार म्हणून जे करू ते ठोस करू, मुंबईत यावर काम सुरू आहे.  दसरा दिवाळी सण आहेत शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहवत नाहीत, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

पैशाचे सोंग आणता येत नाही, जीएसटीचे पैसे आले नाहीत, केंद्राकडून हक्काचे पैसे आले नाहीत. कर्ज उभे करायचे का यावर काम सुरू आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.  कोव्हिड काळात जम्बो हॉस्पिटल , कोविड लॅब राज्याने तात्काळ सुरू केले. महाराष्ट्रानं इतर राज्यांपेक्षा चागलं काम कोरोन संकटात केले आहे. आता कोव्हिड संकट व जीएसटीचा परतावा न मिळाल्याने मदत निर्णय रखडला. राज्याचं अर्थचक्र मोडून टाकणारे कोरोना संकट आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

एकनाथ खडसे महाविकासआघाडीच्या कुटुंबात ते येत आहेत, त्यांचे स्वागत आहे. यशाची शिखरं पादाक्रांत करताना पायाचे दगड ठिसूळ होत आहेत, त्याकडे भाजपने लक्ष द्यावं, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या: 

CM Uddhav Thackeray Osmanabad Visit Live | फडणवीसांच्या टीकेकडे लक्ष द्यायला वेळ नाही : उद्धव ठाकरे

यशाची शिखरं पादाक्रांत करताना पायाची दगडं का निसटत आहेत?; खडसेंच्या राजीनाम्यावरून मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

(CM Uddhav Thackeray said we will immediately take decision of compensation for farmers)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *