मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरांवर गुन्हा दाखल

मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्या विरोधात एल. टी. मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवरा हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत. काही दिवसांपूर्वी देवरांनी आपल्या प्रचारात शिवसेने विरोधात धर्माचा आधार घेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे देवरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहिता पथकातील अधिकारी नरेंद्र परमार यांच्या …

मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरांवर गुन्हा दाखल

मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्या विरोधात एल. टी. मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवरा हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत. काही दिवसांपूर्वी देवरांनी आपल्या प्रचारात शिवसेने विरोधात धर्माचा आधार घेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे देवरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवडणूक आचारसंहिता पथकातील अधिकारी नरेंद्र परमार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी लोकप्रतिनिधी कायद्या अंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. देवरा यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेने जैन धर्मियांच्या पर्युषण काळात त्यांच्या मंदिराबाहेर मांस शिजविले होते. त्यामुळे शिवसेनेला धडा शिकवला पाहिजे, असे सांगत भडकाऊ भाषण केले होते. याबाबत सनी जैन आणि धर्मेंद्र मिश्रा या उच्च न्यायालयातील वकिलांनी आचारसंहिता पथकाकडे तक्रार केली होती. यानंतर निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता पथकाने देवरा यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला पत्र पाठवले होते.

मिलिंद देवरा हे माजी केंद्रीय मंत्री असून, माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांचे सुपुत्र आहेत. दक्षिण मुंबईत 2014 साली शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. त्याआधी मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबईचं प्रतिनिधित्व केलं होतं. यंदाही काँग्रेसकडून मिलिंद देवरा दक्षिण मुंबईतून रिंगणात आहेत.

दरम्यान, मुंबईच्या सर्व सहा लोकसभा मतदारसंघाचे मतदान 29 एप्रिलला होणार आहे. मुंबई शहरातील 527 मतदान केंद्रामधून 2 हजार 601 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल.

संबधित बातम्या :

फक्त मुकेश अंबानी नव्हे, आणखी एका उद्योगपतीचा मिलिंद देवरांना पाठिंबा

मुंबईत मनसेच्या एन्ट्रीने देवरा सुखावले, तर सावंत दुखावले

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *