काँग्रेसचे नाराज नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; राष्ट्रवादीचे आव्हाड म्हणाले, संजय राऊत कधीकधी पत्रकारासारखं बोलून जातात

काँग्रेसने सचिन वाझे प्रकरणात आमची नाहक बदनामी झाली, असे मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे समजते. | Congress CM Uddhav Thackeray

काँग्रेसचे नाराज नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; राष्ट्रवादीचे आव्हाड म्हणाले,  संजय राऊत कधीकधी पत्रकारासारखं बोलून जातात
जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माणमंत्री

मुंबई: संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून सुरु असलेल्या लॉबिंगमुळे नाराज असलेले काँग्रेसचे नेते शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. महाराष्ट्राचे काँग्रेस (Congress) प्रभारी एच.के. पाटील सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने एच.के. पाटील, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते. मात्र, ही बैठक झटपट आटोपली आणि काँग्रेस नेते बाहेर पडले. (Congress leader meets CM Uddhav Thackeray)

या बैठकीत कॉमन मिनिमम प्रोगामच्या अनुषंगाने चर्चा झाली. याशिवाय, निधी वाटप, राज्यमंत्र्यांचे अधिकार आणि महाविकासआघाडीत नसेलला समन्वय या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या तक्रारी लवकर सोडवाव्यात, असे काँग्रेस प्रभारी एच.के. पाटली यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

याशिवाय, वाझे प्रकरणाच्या हाताळणीवरूनही काँग्रेस ठाकरे सरकारवर नाराज आहे. काँग्रेसने सचिन वाझे प्रकरणात आमची नाहक बदनामी झाली, असे मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे समजते. हे प्रकरण सरकारने व्यवस्थितपणे हाताळले नाही. त्यामुळे आमच्यावरही विनाकारण शिंतोडे उडाले, असा नाराजीचा सूर काँग्रेसच्या नेत्यांनी लावला होता.

संजय राऊत कधीकधी पत्रकारासारखं बोलून जातात: आव्हाड

महाविकासआघाडीत काँग्रेस पक्ष नाराज आहे का, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांना विचारण्यात आला. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी मी राष्ट्रवादीचा नेता आहे, मला काँग्रेसच्या नाराजीबाबत माहिती नाही, असे म्हटले.मात्र, सरकार म्हणजे घर आहे. घरात थोडासा वाद होणारच. लॉकडाऊनसंदर्भात तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेतील. त्याबाबत कुठेही संभ्रम नसेल.

संजय राऊत हे नेता आणि पत्रकार अशा दोन भूमिकांमध्ये वावरत असतात. त्यामुळे ते कधीकधी पत्रकारासारखं बोलून जातात, असा चिमटा आव्हाड यांनी काढला.

लक्षात ठेवा, ठाकरे सरकार काँग्रेसच्या टेकूवर, नाना पटोलेंचा शिवसेनेला रोखठोक इशारा

गेल्या काही दिवसांत काँग्रेसने ठाकरे सरकारला दोनदा निर्वाणीचा इशारा दिला आहे. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली 10 वर्षे मनमोहन सिंग यांचे केंद्रात सरकार होते. त्यात शरद पवार मंत्री होते हे विसरता कामा नये. काँग्रेस नेत्यांवर केली जाणारी टीका पक्षाकडून सहन केली जाणार नाही. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या लक्षात ही बाब आणून देणार आहोत. काँग्रेसमुळे सरकार आहे, आम्ही म्हणजे सरकार नाही, हे लक्षात आणून देण्याची वेळ आली आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

वाझे प्रकरणात आमची नाहक बदनामी, संजय राऊतांना समज द्या; काँग्रेस ठाकरे सरकारवर नाराज?

VIDEO: वाझेंची नियुक्ती करू नये म्हणून पवार, राऊत, देशमुखांना भेटलो होतो, अबू आजमींचा गौप्यस्फोट

महाराष्ट्राने नवी दिशा दिली, राष्ट्रीय स्तरावरही तेच व्हावं; संजय राऊतांकडून ममतादीदींचं समर्थन

(Congress leader meets CM Uddhav Thackeray)

Published On - 1:22 pm, Sat, 3 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI