काँग्रेस नेत्यांना गाडी मिळेना, माणिकराव ठाकरेंची धावपळ, रिक्षातून राहुल गांधींच्या स्वागताला

राहुल गांधी यांच्या स्वागताला जाताना गाड्या न मिळाल्याने काँग्रेस नेत्यांना चक्क रिक्षाने जाण्याची वेळ आली. | Congress leaders not got car, took auto for to receive rahul gandhi

काँग्रेस नेत्यांना गाडी मिळेना, माणिकराव ठाकरेंची धावपळ, रिक्षातून राहुल गांधींच्या स्वागताला
सचिन पाटील

| Edited By: Team Veegam

Oct 16, 2019 | 5:33 PM

नागपूर : काँग्रेसच्या सभांना (Congress leaders in auto) येणारं विघ्न काही केल्या कमी होताना दिसत नाही. आधी राहुल गांधी (Rahul Gandhi) हे परदेशी गेल्याने (Congress leaders in auto) राष्ट्रीय नेते प्रचारात नव्हते. मग राहुल गांधींनी (Rahul Gandhi) प्रचारात सहभाग घेतल्यानंतर काँग्रेस नेत्यांना वेगळ्याच समस्यांना सामोरं जावं लागलं. राहुल गांधी यांच्या स्वागताला जाताना गाड्या न मिळाल्याने काँग्रेस नेत्यांना चक्क रिक्षाने जाण्याची वेळ आली.

राहुल गांधी यांची काल यवतमाळ जिल्ह्यातील वणी इथं सभा होती. राहुल गांधी हेलिकॉप्टरने वणी इथं आले. पण त्यावेळी काँग्रेस नेते सभास्थळी होते, त्यामुळे हेलिपॅडजवळ कोणी बडे नेते उपस्थित नव्हते. त्याचवेळी राहुल गांधींचं हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरल्याचं नेत्यांना समजलं.

राहुल गांधी आल्याचं समजताच काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंसह सर्व दिग्गजांची तारांबळ उडाली. सभास्थळावरुन हेलिपॅडवर जाण्यासाठी एकच धावपळ सुरु झाली. मात्र त्यावेळी सभास्थळी गाड्या नसल्याने, हेलिपॅडपर्यंत जायचं कसं हा प्रश्न पडला. त्याचवेळी काँग्रेस नेत्यांना एक रिक्षा दिसली.

या रिक्षातून माणिकराव ठाकरे, खासदार बाळू धानोरकर, काँग्रेस नेते शेखर शिरभाते, वणीचे काँग्रेस उमेदवार वामनराव कासावार चक्क ऑटोतून राहुल गांधींना घ्यायला गेले. परत येताना राहुल गांधीसोबत असलेल्या एसपीजीच्या गाडीत बसून नेतेमंडळी सभास्थळी आले.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें