काँग्रेसचा जम्बो प्लॅन, लोकसभेचे उमेदवार विधानसभेला उतरवण्याची तयारी

काँग्रेसने (Congress plan for Vidhan sabha) वरिष्ठ नेते आणि माजी खासदारांना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याच्या तयारी केली आहे.

काँग्रेसचा जम्बो प्लॅन, लोकसभेचे उमेदवार विधानसभेला उतरवण्याची तयारी

मुंबई : एकीकडे पक्षात सुरु असलेली गळती आणि निवडणुकीत झालेली वाताहत पाहता काँग्रेसने (Congress plan for Vidhan sabha) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जम्बो प्लॅनची तयारी केली आहे. काँग्रेसने (Congress plan for Vidhan sabha) वरिष्ठ नेते आणि माजी खासदारांना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याच्या तयारी केली आहे. दिल्लीतील वरिष्ठांनी त्याबाबत सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजप-शिवसेनेचं आव्हान रोखण्यासाठी काँग्रेसची ही रणनीती आहे. मात्र राज्यातील नेते याला नकार देत आहेत.

माजी मुख्यमंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे पहिल्यापासून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. हायकमांडमुळे त्यांना लोकसभा निवडणूक लढवावी लागली होती. आता ते विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.

ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी खासदार राजीव सातव, संजय निरुपम, मिलिंद देवरा यांना याबाबत विचारले असता त्यांनी हे वृत्त फेटाळले.  पक्षाने असं काहीही सांगितल्याचे, विचारले नसल्याचा दावा या नेत्यांनी केला.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी हा प्रयोग केला होता. राज्यातील प्रमुख मंत्र्यांना लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितले होते. पण त्यात त्यांचा पराभव झाला होता.

आता काँग्रेसकडे अनुभवी उमेदवारांची वानवा असताना, माजी खासदार, नेते विधानसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक दिसत नसल्याचे चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीत पराभव झालेले काँग्रेसचे दिग्गज नेते

  • अशोक चव्हाण
  • सुशीलकुमार शिंदे
  • मिलिंद देवरा
  • संजय निरुपम
  • एकनाथ गायकवाड
  • प्रिया दत्त
  • नाना पटोले
  • माणिकराव ठाकरे
  • राजीव सातव (निवडणूक लढली नाही)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI