MLC Polls | राजेश राठोड की राजकिशोर मोदी? काँग्रेसचा उमेदवार कोण?

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या वतीने राजेश राठोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. (Congress MLC Candidate Rajesh Rathod)

MLC Polls | राजेश राठोड की राजकिशोर मोदी? काँग्रेसचा उमेदवार कोण?

मुंबई : काँग्रेसने दोन जागांचा आग्रह सोडल्याने विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. मात्र काँग्रेसने दोन नावं जाहीर केल्याने पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण? असा प्रश्न सर्वांना पडला होता. राजेश राठोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला. (Congress MLC Candidate Rajesh Rathod)

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या वतीने राजेश राठोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

कोणत्या पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण?

उद्धव ठाकरे – शिवसेना निलम गोऱ्हे – शिवसेना

राजेश राठोड – काँग्रेस

शशिकांत शिंदे – राष्ट्रवादी अमोल मिटकरी – राष्ट्रवादी

रणजितसिंह मोहिते पाटील – भाजप गोपीचंद पडळकर – भाजप प्रवीण दटके – भाजप डॉ. अजित गोपछेडे – भाजप

काँग्रेसने दोन जागांचा आग्रह सोडल्याने विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्गही मोकळा झाला. महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती आणि मुख्यमंत्र्यांचा आदर करत काँग्रेसने आपला एक उमेदवार मागे घेऊन एकाच जागेवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीचे पाच, तर भाजपचे चार उमेदवार बिनविरोध विधानपरिषदेवर निवडून जाणार असल्याचं काल (रविवारी) स्पष्ट झालं.

हेही वाचा : Uddhav Thackeray property | दोन घरं, एक फार्म हाऊस, एकही वाहन नाही, उद्धव ठाकरेंची संपत्ती किती?

तूर्तास निवडणुकीसाठी एकूण 12 उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले आहेत. भाजपने सहा, तर राष्ट्रवादीने तीन उमेदवारी अर्ज भरले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही सहकुटुंब हजेरी लावत उमेदवारी अर्ज दाखल केला.

भाजप चार, शिवसेना दोन, राष्ट्रवादी दोन आणि काँग्रेस एका जागेसाठी निवडणूक लढवणार आहे. मात्र राष्ट्रवादीने एक तर भाजपने दोन अतिरिक्त असे डमी उमेदवार अर्ज सादर केले. अर्ज छाननी प्रक्रिया झाल्यानंतर ते आपापली उमेदवारी मागे घेतील. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षांची लगबग सुरु होती.

डमी उमेदवार कोण?

राष्ट्रवादी काँग्रेसकडून किरण पावसकर यांनी डमी उमेदवार अर्ज सादर केला. तर भाजपकडून संदीप लेले आणि रमेश कराड यांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. हेसुद्धा डमी उमेदवार आहेत. (Congress MLC Candidate Rajesh Rathod)

कोणत्या पक्षाकडून किती उमेदवारी अर्ज?

भाजप – 6 राष्ट्रवादी – 3 शिवसेना – 2 काँग्रेस 1

कुणाचं संख्याबळ काय?

सध्या ज्या जागा रिक्त झाल्यात त्यात भाजपच्या 3, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3, काँग्रेसच्या 2 आणि शिवसेनेची 1 अशा एकूण 9 जागांचा समावेश आहे. संख्याबळाचा विचार केला तर महाविकास आघाडीच्या 5 आणि भाजपच्या 3 जागा सहज निवडून येतील. तर मित्रपक्षांच्या साथीने चौथी जागाही भाजप जिंकू शकतो.

पक्षीय बलाबल लक्षात घेता भाजपकडे 105, शिवसेनेकडे 56, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 54, काँग्रेसचे 44, बहुजन विकास आघाडी 3, समाजवादी पार्टी 2, एमआयएम 2, प्रहार जनशक्ती 2, मनसे 1, माकप 1, शेतकरी कामगार पक्ष 1, स्वाभिमानी पक्ष 1, राष्ट्रीय समाज पक्ष 1, जनसुराज्य पक्ष 1, क्रांतिकारी शेतकरी पक्ष 1, अपक्ष 13 आमदारांचा समावेश आहे. त्यातून निवडून येण्यासाठी एका जागेसाठी 29 मतांची गरज आहे.

संबंधित बातम्या :

विधानपरिषदेसाठी 12 उमेदवारी अर्ज दाखल, भाजपकडून सहा, तर राष्ट्रवादीचे तीन अर्ज

MLC Polls | विधानपरिषदेच्या नऊ रिक्त जागा, दहा उमेदवार, कोणत्या पक्षाकडून कोणाला तिकीट?

MLC Polls | विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीचे दोन उमेदवार जाहीर

MLC Polls | असंच चालू राहिलं, तर मी निवडणूकच लढवणार नाही, उद्धव ठाकरेंचा कॉंग्रेसला निरोप : सूत्र

आधी विधानसभा, आता विधानपरिषदेला डावललं, मेधा कुलकर्णींच्या डोळ्यात दुसऱ्यांदा पाणी, दादांनी प्रॉमिस मोडल्याचा आरोप

खडसे, बावनकुळे आणि पंकजा मुंडे स्वतःच स्वतःला समजावून सांगतील : चंद्रकांत पाटील

MLC Polls : ‘मोदी गो बॅक’ म्हणणाऱ्यांना उमेदवारी, एकनाथ खडसे खवळले

MLC Polls | मुंडे, खडसे, तावडे, बावनकुळेंच्या नावावर फुली, भाजपचे चार उमेदवार जाहीर

MLC Polls | काँग्रेस सहाव्या जागेसाठी आग्रही, मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार?

(Congress MLC Candidate Rajesh Rathod)

Published On - 5:43 pm, Mon, 11 May 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI