मधुकर पिचड, चित्रा वाघ यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीचे 4 आमदार भाजपमध्ये दाखल!

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीला (Congress-NCP) भगदाड पडलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे 4 आमदार आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.

मधुकर पिचड, चित्रा वाघ यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीचे 4 आमदार भाजपमध्ये दाखल!

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत सत्ताधारी भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीला (Congress-NCP) भगदाड पडलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 4 आमदारांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. गरवारे क्लब हाऊसमध्ये भाजपची मेगाभरती  झाली.

शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड, त्यांचे सुपुत्र वैभव पिचड (Vaibhav Pichad), साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhonsle) , मुंबईच्या वडाळा येथील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar), नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक (Sandeep Naik) आणि राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.

LIVE UPDATE 

भाजपमध्ये आज प्रवेश केलेल्या नेत्यांची नावे

  1. राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड
  2. राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड
  3. राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले
  4. राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक
  5. काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर
  6. राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ
  7. नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक
  8. महात्मा फुले यांच्या वंशज नीता हुले
  9. माजी पोलीस उपायुक्त साहेबराव पाटील

 शिवसेना-भाजप वेगळं लढणार अशा बातम्या येत आहेत, त्यांना सांगू इच्छितो, आम्ही मित्रपक्ष मिळूनच निवडणूक लढू, महाराष्ट्रात युतीचेच सरकार येणार, बहुमताचा नवा विक्रम रचू – मुख्यमंत्री 

आम्ही आधी राधाकृष्ण विखेंना भाजपमध्ये घेतलं नाही, आधी सुजय विखेंना घेतलं, तसंच आधी वैभव पिचडांना घेतल्याने मधुकर पिचड सापडले, त्याशिवाय आधी रणजीतसिंह मोहिते पाटलांना भाजपमध्ये घेतल्याने विजयसिंह मोहिते पाटील आपोआप आले – मुख्यमंत्री 

भाजपचं विकासाला प्राधान्य आहे. ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, पक्ष त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे – सुधीर मुनगंटीवार 

वाघांची संख्या वाढतेय, त्यात आणखी एक वाढ झाली चित्रा वाघ यांची, आता वाघांची संख्या ३१३ झाली. आता काही पक्षांचे तीन तेरा वाजवण्याचं काम त्या करतील – सुधीर मुनगंटीवार  

माझं वय 79 आहे, आज काही मागणार नाही, केवळ एक इच्छा आहे, हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा, देश ज्या दिशेने जातोय, त्या दिशेने जावं ही कार्यकर्त्यांची भावना आहे, त्यामुळेच आज भाजपमध्ये – मधुकर पिचड 

मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या प्रवेशानं मोठी खळबळ उडाली होती. एका नेत्यांनी आरोप केला त्यांना ईडीची धास्ती दाखवली जात आहे. पण भुजबळ, गणेश नाईकांना कसली धास्ती दाखवली होती? तुम्ही केलं ते योग्य, आम्ही केलं तर चुकीचं कसं? घरात मुलगा लग्न झाल्यावर बाहेर पडतो कारण त्याला पुढचे आयुष्य दिसतं तशीच या लोकांची परिस्थिती आहे- चंद्रकांत पाटील

  • भाजपच्या मंचावर राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, कालिदास कोळंबकर, सुधीर मुनगंटीवार, शिवेंद्रराजे भोसले, विनोद तावडे, वैभव पिचड, संदीप नाईक, चित्रा वाघ  यांची हजेरी

चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

येत्या काळात अनेक राजकीय बॉम्ब फुटतील. आतापर्यंत जे प्रवेश झाले त्यामुळं निष्ठावंतांवर अन्याय होणार नाही. शिवसेना- भाजप युती कायम राहिल. भाजप प्रवेशानं कोणाचीही अडचण होणार नाही. पवारांनी वेगळा पक्ष काढला तेव्हा भुजबळ, गणेश नाईक यांच्यावर दबाव आणला होता का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला.

मुंबईतील गरवारे क्लब हाऊसमध्ये भाजपची मेगाभरती होत आहे. इथेच भाजप खासदार सुजय विखे पाटील यांचाही भाजप प्रवेश झाला होता. दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चार आमदारांसह त्यांचे समर्थक आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या चारही आमदारांनी कालच विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला.

दरम्यान, राष्ट्रवादीचे माजी आमदार संदीप नाईक आणि नवी मुंबईचे माजी महापौर  सागर नाईक हे आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या 57 नगरसेवकांचा मात्र आज भाजप प्रवेश होणार नाही. तांत्रिक कारणांमुळे हा पक्षप्रवेश लांबला आहे.

संबंधित बातम्या 

सुनील तटकरे भेटीसाठी चंद्रकांत पाटलांच्या बंगल्यावर!

काँग्रेस–राष्ट्रवादीच्या चार आमदारांचे राजीनामे 

कोण कितीही पावरफुल असो, सत्ता नसली की लोक विसरतात : शिवेंद्रराजे भोसले  

Published On - 10:12 am, Wed, 31 July 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI