“फक्त शिवाजी महाराजांचीच माफी मागू नका, तर…”, राहुल गांधी महाराष्ट्रात येताच आक्रमक

या मुद्द्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येत आहेत. त्यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर निशाणा साधला.

फक्त शिवाजी महाराजांचीच माफी मागू नका, तर..., राहुल गांधी महाराष्ट्रात येताच आक्रमक
Follow us
| Updated on: Sep 05, 2024 | 3:26 PM

Rahul Gandhi Attack On PM Narendra Modi : सिंधुदुर्गातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. यावरुन विरोधकही आक्रमक झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या मुद्द्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका करत आहेत. त्यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधींनीही यावरुन भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

राहुल गांधी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जोरदार भाषण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालघर दौऱ्यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यात कोसळल्याच्या घटनेप्रकरणी जाहीरपणे माफी मागितली होती. त्यावरुन आता राहुल गांधींनी जोरदार टीका केली आहे. फक्त शिवाजी महाराजांचीच माफी मागू नका. राज्यातील प्रत्येक व्यक्तीची माफी मागा, अशी आक्रमक मागणी राहुल गांधी यांनी केली.

“…म्हणून पंतप्रधान मोदींनी माफी मागितली”

गेल्या साठ वर्षात त्यांनी तुमची माफी मागितली नाही. कारण गरज पडली नाही. ज्याने चूकच केली नाही त्यांनी माफी कशाची मागायची. राज्यात काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराजांची मूर्ती बनवली. पंतप्रधानांनी माफी मागितली. पंतप्रधानांनीस कोणत्या कारणाने माफी मागितली. वेगवेगळी कारणे असतील. पहिलं कारण ही मूर्तीचं कंत्राट संघाच्या कार्यकर्त्याला दिलं. पंतप्रधान मोदींना हे सांगायचं असेल मला हे कंत्राट संघाच्या कार्यकर्त्याला द्यायचं नव्हतं. मेरीटमध्ये द्यायचं होतं. दुसरं कारण मूर्तीच्या कामात भ्रष्टाचार झाला होता. मी ज्याला कंत्राट दिलं त्याने भ्रष्टाचार केला हे कारण असेल. म्हणून माफी मागितली, असे राहुल गांधी म्हणाले.

“फक्त शिवाजी महाराजांची माफी मागू नका…”

शिवाजी महारांचं स्मरण म्हणून मूर्ती बनवली. पण ती उभी राहू शकेल एवढंही लक्ष दिलं नाही. पतंगराम कदम यांचा पुतळा बनवला. पुढे ५० वर्षानंतरही हा पुतळा असाच असेल. सर्वात मोठे महापुरुष शिवाजी महाराज यांचा पुतळा बनवतो. काही दिवसात भ्रष्टाचारामुळे, चुकीच्या व्यक्तीला कंत्राट दिल्याने मूर्ती पडते. शिवाजी महाराजांचा अपमान झाला. त्यांनी फक्त शिवाजी महाराजांची माफी मागू नये. राज्यातील प्रत्येक व्यक्तीची माफी मागितली पाहिजे. मोदींना हे सांगितलं पाहिजे, तुम्ही फक्त दोनच माणसांचं सरकार का चालवता. मोठी कंत्राट अदानी आणि अंबानीला मिळतात, अशीही टीका राहुल गांधींनी केली.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.