काँग्रेसनं सावध व्हावं, पक्षाचे 18 नगरसेवक राष्ट्रवादीत केल्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचा इशारा

काँग्रेसचे (Congress) भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेतील 18 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने काँग्रेसला सावध होण्याचा इशारा दिलाय.

काँग्रेसनं सावध व्हावं, पक्षाचे 18 नगरसेवक राष्ट्रवादीत केल्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचा इशारा

मुंबई : काँग्रेसचे (Congress) भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेतील 18 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने काँग्रेसला सावध होण्याचा इशारा दिलाय. महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस विनायकराव देशमुख यांनी भिवंडी-निजामपूर नगरपालिकेच्या 18 काँग्रेस नगरसेवकांचा राष्ट्रवादीतील प्रवेश गंभीरपणे घेण्याचा सल्ला दिलाय. देशमुख यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना खुलं पत्र लिहून सावध होण्याचा इशारा दिलाय (Congress senior leader warn Congress about Bhivandi Nijampur MC politics).

भिवंडी-निजामपूर नगरपालिकेतील काँग्रसच्या उपमहापौरांसह 18 नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटिल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. देशमुख म्हणाले, “हे प्रकरण सावध होण्यासारखं आहे, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल. काँग्रेस पक्षाने केवळ महाराष्ट्र विकास आघाडीचा घटक होऊन आणि सरकारमध्ये मंत्रिपद घेऊन समाधानी व्हायला नको.”

‘राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते अस्वस्थ’

“शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळालं आहे, पण काँग्रेस देखील आक्रमक आहे. राज्यात काँग्रेसचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी नुकतेच आपल्या कार्यकर्त्यांना शिवसेनेसोबत समन्वय करण्यास सांगितले. त्यानंतर काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षात सहभागी करुन घेण्यात आलं. हा केवळ योगायोग नाही,” असं मत विनायक देशमुख यांनी व्यक्त केलं.

“याआधी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये शिवसेनेचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. मात्र, नंतर ते काँग्रेसमध्ये पुन्हा परतले. यानंतर मित्रपक्ष आपआपसात पक्षांतर करण्यावर नियंत्रण ठेवतील असं ठरलं होतं, तर मग काँग्रेसचे नगरसेवक राष्ट्रवादीत कसे गेले?” असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला.

‘…तर काँग्रेसचं सर्वाधिक नुकसान’

महाराष्ट्र काँग्रेसच्या नेतृत्वाने समन्वय समितीतील आपल्या मित्रपक्षांकडे याबाबत उत्तर मागितलं पाहिजे. अन्यथा सत्ताधारी आघाडीत सर्वात जास्त नुकसान काँग्रेसचंच होईल. दुसरीकडे शिवसेनेचे एक वरिष्ठ नेते म्हणाले, “काँग्रेसचे नगरसेवक पक्षातील स्थानिक पातळीवरील गटबाजीमुळे पक्ष सोडून गेलेत. ते आमच्याकडे आले होते, मात्र आम्ही त्यांना उत्तर दिलं नाही. जर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना प्रवेश दिला नसता तर ते भाजपमध्ये गेले असते.”

हेही वाचा :

ठाण्यात नाईट कर्फ्यूची कडक अमलबजावणी, पोलिसांकडून कसून तपासणी

ब्रिटनच्या कोरोनाचा धसका, ठाणे पोलिस आयुक्त अ‌ॅक्शन मोड, शहरात कडक संचारबंदीसह वाहनांची कसून तपासणी

ठाणे मनपाच्या अधिकाऱ्याला अनधिकृत फेरीवाल्यांकडून दरमहा 3 कोटींचा हप्ता, काँग्रेसचा गंभीर आरोप

Congress senior leader warn Congress about Bhivandi Nijampur MC politics

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI