AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लसीसाठी तरतूद केलेले 35 हजार कोटी गेले कुठे? राज्यांवर लसींचा बोजा का?

गेल्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारनं कोरोना लसीसाठी तब्बल 35 हजार कोटींची तरतूद केली होती. मात्र हे 35 हजार कोटी रुपये कुठे गेले

लसीसाठी तरतूद केलेले 35 हजार कोटी गेले कुठे? राज्यांवर लसींचा बोजा का?
Corona Vaccine
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: May 20, 2021 | 12:29 PM
Share

मुंबई : जगातली सर्वात मोठी लस निर्मितीची कंपनी (corona vaccine) भारतात असूनही भारतातच लसीकरण केंद्रांवर वॅक्सिनेशन बंद (vaccination) असे बोर्ड लागत आहेत. जवळपास दीड महिन्यांपासून महाराष्ट्र सरकार (Maharashtra vaccine shortage) लसीच्या तुटवड्याबाबत तक्रार करतंय. सुरुवातीच्या टप्प्यात केंद्र सरकारनं महाराष्ट्राला पुरेपूर लस दिल्याचा दावा केला. (Covid19 vaccination 35,000 crore allotted for COVID-19 vaccine in union budget then why Then why the burden on the states)

मात्र सध्या देशातल्या प्रत्येक राज्यात लसीचा तुटवडा आहे. ज्या राज्याला जितके डोस हवेत, त्या प्रमाणात त्यांन मिळत नाहीत, हे वास्तव नाकारुन चालणार नाही. विशेष म्हणजे गुजरात आणि इतर भाजपशासित राज्यांमध्ये लसींचा तुटवडा आहे.

महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर

  • औरंगाबादमध्ये 300 लसीकरण केंद्र आहेत, मात्र लसीअभावी सध्या फक्त 3 केंद्र सुरु आहेत.
  • सांगलीत 280 केंद्र होती, सध्या फक्त 120 केंद्रांवरच लस मिळतेय
  • परभणीत 205 केंद्र आहेत, पण सध्या फक्त 23 केंद्र सुरु आहेत
  • कोल्हापुरात 220 केंद्रांपैकी फक्त 61 केंद्रांवर लस मिळतेय
  • वाशिममध्ये 140 केंद्रापैकी फक्त 20 केंद्र सुरु आहेत
  • चंद्रपुरात 367 केंद्रांपैकी 67 केंद्रावरच लस मिळतेय

35 हजार कोटींची तरतूद

भारताकडे लसीसाठी पुरेपूर पैसा होता. मग धोरण कुठे चुकलं? असा प्रश्न आता विचारला जातोय. कारण, गेल्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारनं कोरोना लसीसाठी तब्बल 35 हजार कोटींची तरतूद केली होती. मात्र हे 35 हजार कोटी रुपये कुठे गेले, जर इतका पैसा तरतूद केला गेला, तर राज्यं स्वतःच्या पैशांनी लस का खरेदी करतायत, असा प्रश्न विरोधक विचारत आहेत.

दोन डोसमधील अंतर वाढवण्याचं कारण काय? 

चिंतेची गोष्ट म्हणजे दोन डोसमधलं अंतर वाढवण्यात काही शास्रीय कारण आहे, की मग लसीच्या तुटवड्यामुळे वारंवार निर्णयात फेरबदल होतोय, अशीही शंका व्यक्त केली जातेय.

  • जानेवारी महिन्यात 2 डोसमधलं अंतर 28 दिवस होतं
  • मार्च महिन्यात तेच अंतर 45 दिवसांवर नेलं गेलं
  • मे महिन्यात पुन्हा त्यात वाढ करुन दोन डोसमधलं अंतर 90 दिवस करण्यात आलं

कोणत्या देशाकडे किती लसी? 

आता जगाच्या तुलनेत भारताकडे किती कोरोना लसी आहेत., आणि इतर देशांनी किती डोस बूक करुन ठेवले आहेत, ते ही पाहा.

  • कॅनडाची लोकसंख्या जवळपास 4 कोटी आहे, मात्र डोस बुक केलेत 33 कोटी
  • ब्रिटनची लोकसंख्या 7 कोटी, डोस बुक केलेत 45 कोटी
  • ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या अडीच कोटी, डोस बुक केलेत 12 कोटी
  • अमेरिकेची लोकसंख्या 33 कोटी, आणि डोस बुक केलेत तब्बल 120 कोटी

लोकसंख्येच्या प्रमाणात डोस बुक करण्यामध्ये भारत प्रचंड मागे आहे. अगदी ब्राझील, इंडोनेशियासारख्या देशांनीही लोकसंख्येच्या तुलनेत जास्त डोस बुक केलेत. दोन महिन्यांपूर्वी लसीकरण मोहिमेत भारत हाच जगाचं नेतृत्व करण्याच्या बातम्या येत होत्या. भारतच साऱ्या जगाला कोरोना लस देऊ शकतो, असे दावे केले जात होते. मात्र त्याच भारताला दोनच महिन्यात रशियाकडून लस आयात करावी लागली.

संबंधित बातम्या 

Covid 19 Home Test Kit Demo : 250 रुपयाच्या किटने घरीच कोरोना टेस्ट कशी करायची? स्टेप बाय स्टेप माहिती   

Mask Kissing | मास्क लावून ‘किस’ करणं सुरक्षित आहे का? वाचा तज्ज्ञ काय म्हणतात…   

मृत्यूनंतरही कोरोना रुग्णावर 3 दिवस उपचार, पैसे उकळण्यासाठी नांदेडच्या रुग्णालयाची बदमाशी

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

मारा.. मारा.. मारा.. 300-400 तरुणांच्या घोळक्याने चढवला पोलिसांवर हल्ला, दिल्लीतील हादरवणारी व्हिडीओ...

मारा.. मारा.. मारा.. 300-400 तरुणांच्या घोळक्याने चढवला पोलिसांवर हल्ला, दिल्लीतील हादरवणारी व्हिडीओ..

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत वैभवला झंझावात खेळी करावीच लागणार, असं नाही केलं तर…काय घडणार?.

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत वैभवला झंझावात खेळी करावीच लागणार, असं नाही केलं तर…काय घडणार?

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?.

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक.

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक