Covid 19 Home Test Kit Demo : 250 रुपयाच्या किटने घरीच कोरोना टेस्ट कशी करायची? स्टेप बाय स्टेप माहिती

पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन लिमिटेड कंपनीने घरच्या घरी रॅपिड अँटिजन टेस्ट किट तयार केलं आहे ( Covid 19 Home Test Kit)

Covid 19 Home Test Kit Demo : 250 रुपयाच्या किटने घरीच कोरोना टेस्ट कशी करायची? स्टेप बाय स्टेप माहिती
Covid 19 Home Test Kit
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 11:54 AM

मुंबई : इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) घरात कोरोना व्हायरस टेस्टिंग (Covid-19 Home Test Kit) करण्यासाठी कोविसेल्फ (Coviself) किटला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे आता कोणालाही अवघ्या 250 रुपयात घरच्या घरी रॅपिड अँटिजन टेस्ट किट (RAT) आणून कोव्हिड चाचणी करता येईल. विशेष म्हणजे फक्त 15 मिनिटात कोरोना चाचणीचा अहवाल हाती येणार आहे. ICMR ने मात्र विनाकारण चाचणी न करण्याचा सल्ला दिला आहे. (Covid 19 Home Test Kit MyLab Solutions Coviself Rapid Antigen Tests Know Step by Step Process)

चाचणी कोणी करावी?

पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन लिमिटेड कंपनीने घरच्या घरी रॅपिड अँटिजन टेस्ट किट तयार केलं आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणं दिसत आहेत किंवा ज्या व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आली आहेत, त्यांनीच या किटचा वापर करावा, असा सल्ला या कंपनीने दिला आहे. RAT चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींना कोरोनाबाधित म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. त्यांची पुन्हा चाचणी करण्याची आवश्यकता नाही. तर लक्षणं असूनही (सिम्पटमॅटिक) ज्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असेल, त्यांना कोरोना संशयित मानलं जाईल. ते स्वतःची आरटी-पीसीआर टेस्ट करु शकतात.

कसा वापर करावा? जाणून घ्या स्टेप्स

मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन लिमिटेड कंपनीच्या युजर मॅन्युअलनुसार,

  1. नेझल स्वॅब दोन्ही नाकपुड्यांमध्ये 2 से 4 सेमी आतपर्यंत टाकावे.
  2. त्यानंतर नेझल स्वॅब दोन्ही नाकपुड्यांत पाच वेळा फिरवावे.
  3. स्वॅब आधीपासून भरलेल्या ट्यूबमध्ये टाकावा आणि उरलेला स्वॅब तोडून टाकावा.
  4. ट्यूबचे झाकण बंद करावे.
  5. टेस्ट कार्डवर ट्यूब दाबून एकामागून एक दोन थेंब टाकावेत.
  6. चाचणी अहवालासाठी 15 मिनिटं वाट पाहावी.
  7. 20 मिनिटांनंतर येणारा निकाल अवैध मानला जाईल.

टेस्ट कार्डवर दोन सेक्शन असतील. एक कंट्रोल, तर दुसरा टेस्ट सेक्शन. जर बार केवळ कंट्रोल सेक्शन ‘C’वर असेल, तर कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आहे. जर बार कंट्रोल सेक्शन ‘C’ आणि स्ट सेक्शन ‘T’ या दोन्हीवर असेल, तर अँटिजन टेस्ट पॉझिटिव्ह आहे.

चाचणी झाल्यावर काय करावे?

हे टेस्ट किट एका आठवड्यात बाजारात उपलब्ध होईल. हे प्रॉडक्ट तयार करण्यासाठी आम्हाला पाच महिन्यांचा कालावधी लागला होता. आम्ही त्याची किंमत प्रतिकिट 250 रुपये ठेवली आहे. यात कर समाविष्ट आहे. किट वापरण्यास सोपे आणि जैविक कचरा निर्माण करणारे नसेल, असे त्याचे डिझाईन केले आहे. किटसोबत येणाऱ्या सेफ्टी बॅगेत टाकून तुम्ही ते डिस्पोज करु (कचऱ्यात टाकू) शकता, असं मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन लिमिटेड कंपनीचे एमडी हसमुख रवाल यांनी सांगितले.

टेस्ट पॉझिटिव्ह येण्यासाठी 5 से 7 मिनिटांची वेळ लागेल, तर निगेटिव्ह येण्यासाठी जास्तीत जास्त 15 मिनिटांचा वेळ लागेल. टेस्ट किटच्या पाऊचमध्ये आधीच भरलेली एक्स्ट्रॅक्शन ट्यूब, नेझल स्वॅब, एक टेस्ट कार्ड आणि सेफ्टी बॅग असेल. याशिवाय टेस्ट करणाऱ्या व्यक्तीला आपल्या फोनमध्ये मायलॅब कोविसेल्फ अॅप डाऊनलोड करावे लागेल. कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्या सर्व व्यक्तींना होम आयसोलेशन, ICMR आणि आरोग्य मंत्रालयाच्या नियमांचं पालन करुन काळजी घ्यावी लागेल.

पाहा डेमो व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

आता घरच्या घरी कोरोना चाचणी करणं शक्य, होम बेस्ड टेस्ट किटला मंजुरी, ICMRचा महत्त्वाचा निर्णय

कोरोनावर मात केल्यानंतर सारखा थकवा येतोय? मग आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा !

घरगुती उपाय करून कोरोनाची लक्षणे दूर करा; जाणून घ्या काय आहेत प्रभावी उपाय

(Covid 19 Home Test Kit MyLab Solutions Coviself Rapid Antigen Tests Know Step by Step Process)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.