Political Cricket : आता नेतेमंडळी राजकीय नाही तर क्रिकेटच्या मैदानावर करणार जोरदार बॅटिंग! भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची टीमही तयार

Political Cricket : आता नेतेमंडळी राजकीय नाही तर क्रिकेटच्या मैदानावर करणार जोरदार बॅटिंग! भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची टीमही तयार
राजकीय पक्षांच्या क्रिकेट स्पर्धा
Image Credit source: Tribune india

आज आणि उद्या या मॅच होणार आहेत. पाषाण सुस रोडवरील सनी वर्ल्डमध्ये या स्पर्धा रंगणार आहेत. यात मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप, शिवसेना, आप यांच्यासह आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचीही एक टीक या स्पर्धेत उतरणार आहे.

दिनेश दुखंडे

| Edited By: सागर जोशी

May 28, 2022 | 5:30 PM

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या टीका टिप्पणी आणि आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसून येत आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटकपक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते आणि भाजप नेते एकमेकांवर हल्ला चढवण्याची एकही संधी सोडत नाहीत. महापालिका निवडणुकीच्या (Municipal Election) पार्श्वभूमीवर तर राजकारण अधिकच तापलं आहे. सभा आणि बैठकांचा सिलसिलाही सुरु झालाय. अशावेळी सर्वच राजकीय पक्षांचे नेते आता एकाच मैदानावर पाहायला मिळणार आहेत. मात्र, हे मैदान राजकीय नाही तर क्रिकेटचं (Political Cricket) आहे. ‘सरकारनामा’कडून पुण्यात राजकीय पक्षाच्या क्रिकेट मॅचचं आयोजन केलं आहे. आज आणि उद्या या मॅच होणार आहेत. पाषाण सुस रोडवरील सनी वर्ल्डमध्ये या स्पर्धा रंगणार आहेत. यात मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप, शिवसेना, आप यांच्यासह आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचीही एक टीक या स्पर्धेत उतरणार आहे.

पक्ष आणि खेळाडू

राष्ट्रवादी काँग्रेस

मंत्री धनंजय मुंडे, आमदार सुनील टिंगरे, आमदार सुनील शेळके, आमदार चेतन तुपे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार आशुतोष काळे आणि पुण्यातील प्रमुख नेते

काँग्रेस

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे, आमदार अमित झणक, कुणाल राऊत, सत्यजित तांबे आणि पुण्यातील प्रमुख नेते

भारतीय जनता पार्टी

आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार महेश लांडगे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार राहुल कुल, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, हर्षवर्धन पाटील आणि अन्य नेते

शिवसेना

मिलिंद नार्वेकर, उदय सामंत, धैर्यशील माने, ओमराजे निंबाळकर, उदय सामंत, चंद्रकांत मोकाटे, संजय मोरे, प्रमोद भानगीरे, गजानन थरकुडे, किरण साळी, विशाल धनवडे

आयएएस

विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पीएमआरडीए आयुक्त सुहास दिवसे यांच्यासह पुण्यातील इतर प्रमुख अधिकारी

आयपीएस

पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्यासह पुण्यातील प्रमुख पोलिस अधिकारी

तर या स्पर्धेचे उद्घाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर असणार आहेत. तर पारितोषिक वितरण समारंभ गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें