AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mukesh Ambani bomb scare : फडणवीसांच्या 4 प्रश्नांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे आरोपीच्या पिंजऱ्यात

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या 4 प्रश्नांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिले आहेत. (Devendra fadanvis Allegation Police officer Sachi Vaze)

Mukesh Ambani bomb scare : फडणवीसांच्या 4 प्रश्नांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे आरोपीच्या पिंजऱ्यात
Devendra fadanvis And Police officer Sachin Vaze
| Updated on: Mar 05, 2021 | 5:25 PM
Share

 मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी  (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकानंतर आता नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण जी स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडली होती, त्या गाडीमालकाचा मृतदेह सापडला आहे.  मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. (Devendra fadanvis Allegation Police officer Sachi Vaze)

लोकल पोलिसांच्या आधी सचिन वाझे हे कसे पोहोचले?

“मी आज विधानसभेत मुकेश अंबानींच्या घराबाहेर जी जिलेटिन भरलेली स्कॉर्पिओ मिळाली होती, त्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. मनसुख हिरेन यांची ही गाडी होती. त्यांची गाडी चोरीला गेली होती. त्यांची गाडी बंद झाली तिथून ते क्रॉफर्ड मार्केटला आले होते. तिथे ते एका व्यक्तीला भेटले, तो व्यक्ती कोण? हे या प्रकरणाचं मूळ आहे. ही गाडी जिथे सापडली, तिथे लोकल पोलिसांच्या आधी सचिन वाझे हे कसे पोहोचले? त्यांनाच धमकीची ती चिठ्ठी कशी मिळाली?”, असा सवाल फडणवीस यांनी विचारला.

सचिन वाझे यांना IO म्हणजे तपास अधिकारी का नेमलं?

“सचिन वाझे यांचं घर ठाण्यात, जी गाडी चोरी झाली ती सुद्धा ठाण्यातील, इतकंच नाही जी गाडी चोरी होऊन ज्या रुटने आली आणि तिथे पार्क झाली, तिच्यासोबत सफेद इनोव्हा ठाण्यातूनच आली. एक गाडी पार्क झाली आणि एक निघून गेली. त्याच सचिन वाझे यांना IO म्हणजे तपास अधिकारी नेमलं”.

सचिन वाझेंचं या गाडी मालकाशी संभाषण झालं होतं

“सचिन वाझे सगळ्यात आधी पोहोचले. त्यांनी चिठ्ठी हातात घेतली,. त्यांनाच चौकशी अधिकारी नेमलं. आश्चर्य म्हणजे जून-जुलैमध्ये २०२० मध्ये सचिन वाझेंचं या गाडी मालकाशी संभाषण झालं होतं.. योगायोग म्हणजे गाडीमालक ठाण्यातले, आयओ ठाण्यातले, ही गाडी ठाण्यातली, त्याच्यासोबत एक गाडी आली ती ठाण्यातूनच आली, त्यापेक्षा संशयास्पद बाब म्हणजे एका टेलिग्राम चॅनलवर एक संघटनेच्या नावाने जयशूल हिंद हा आम्ही अटॅक केलीय, ही गाडी आम्ही ठेवलीय, आम्हाला रॅनसम द्या, क्रिप्टो करन्सी द्या असं पत्र प्रसिद्ध झालं. त्याच्या दुसऱ्या दिवशी जय शूल या संघटनेने एक मेल पाठवला आणि सांगितलं आमचा याच्याशी संबंध नाही”.

तत्काळ या केसचा तपास NIA कडे द्या

“यामध्ये मी एक शक्यता वर्तवली होती, यातील सर्वात महत्त्वाचा दुवा मनसुख हिरेन हे होते. त्यांना तात्काळ सुरक्षा द्यायला हवी. मला आताच माहिती मिळाली, मनसुख हिरेन यांची बॉडी ठाण्याजवळ मुंब्र्याच्या जवळपास सापडली आहे, त्यामुळे हे प्रकरण गंभीरच नाही तर अत्यंत गुंतागुंतीचं आणि सर्वांकरिता चॅलेंजिग आहे. मला वाटतं हा जो योगायोग आहे, यातून जो संशय तयार झालाय आणि इतका प्राईम विटनेसची बॉडी मिळते, निश्चितच यामध्ये काही गौडबंगाल आहे. त्यामुळे ही केस तात्काळ NIA ला दिली पाहिजे आणि यामागील सत्य बाहेर यायला हवं”.

(Devendra fadanvis Allegation Police officer Sachi Vaze)

हे ही वाचा :

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा मृतदेह सापडला

Video: अंबानी स्फोटक गाडी प्रकरण: ज्या गाडीच्या मालकानं आत्महत्या केली?, ते मनसुख हिरेन टीव्ही 9 शी काय बोलले होते? नक्की पाहा…

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.