AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ब्राह्मण असल्याने टार्गेट’, मराठा आरक्षण लढाईदरम्यान फडणवीसांचा आरोप

आपण ब्राह्मण असल्यानं टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केलाय (Devendra Fadnavis allegation of Brahmin Caste and Maratha Reservation).

'ब्राह्मण असल्याने टार्गेट', मराठा आरक्षण लढाईदरम्यान  फडणवीसांचा आरोप
| Updated on: Sep 17, 2020 | 11:45 PM
Share

मुंबई : मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात मिळालेली स्थगिती कशी उठवली जावी, यावर मंथन सुरु आहे. मात्र अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी गंभीर आरोप केलाय. आपण ब्राह्मण असल्यानं टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केलाय (Devendra Fadnavis allegation of Brahmin Caste and Maratha Reservation). त्यामुळे मराठा आरक्षणाची लढाई सुरु असताना फडणवीसांना आताच जात का आठवली? असा प्रश्न विचारला जात आहे.

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्यानंतर, आता विरोधकांकडून सरकारवर आणि सरकारकडून विरोधकांवर चिखलफेक सुरु आहे. मात्र आपण ब्राह्मण असल्यानं टार्गेट केलं जात असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलाय. कोर्टात बाजू मांडू नये, असं फडणवीस सरकारनं सांगितलं होतं. त्यामुळं हायकोर्टात युक्तीवाद केला नाही, असा गौप्यस्फोट काही दिवसांआधीच महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांनी केला होता. तिथूनचं फडणवीसांवर टीका सुरु झाली.

महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी म्हणाले होते, “मी कोर्टात बाजू मांडू नये, अशी मागणी मराठा समाजाने केली होती. मात्र तरीही याबाबत मी शक्य ती सगळी मेहनत घेतली. त्यानंतर सरकारने तुम्ही बाजू मांडू नका अशी विनंती मला केली. त्यामुळं तत्कालीन फडणवीस सरकारचा मान राखून मी हायकोर्टात प्रत्यक्ष बाजू मांडली नाही. समाजाचा आणि तत्कालीन सरकारचा मान राखला.”

यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कुंभकोणी जे बोलतायत ते हायकोर्टाच्या वेळचं आहे. आता आमचं सरकार नाही. आता आम्ही थोडी सुप्रीम कोर्टात रोखलं.” ब्राह्मण असल्यानंच टार्गेट केलं जातंय, असं फडणवीस जे बोलतायत. ते याआधी मुख्यमंत्री असतानाही बोललेत. ब्राह्मण मुख्यमंत्री झाला हे पवारांना पचनी पडत नाही, असं फडणवीस म्हणालेले आहेत.

आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानं मराठा समाज रस्त्यावर उतरलाय. त्याचवेळी फडणवीसांच्या गंभीर आरोपांनी अनेक सवाल उपस्थित झालेत. ब्राह्मण असल्यानंच टार्गेट केलं जात असल्याचं फडणवीसांना का वाटतं? फडणवीसांची जात ब्राह्मण असल्यानंच आरक्षणाच्या स्थगितीवरुन लक्ष्य केलं जातंय? जातीवरुन टार्गेट करणारे नेमके कोण, फडणवीस नाव का सांगत नाही? देवेंद्र फडणवीसांचं महाविकास आघाडीकडे बोट आहे का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

महाराष्ट्रानं 5 वर्षे मुख्यमंत्री केलं. तुमच्या नेतृत्वात सर्वाधिक जागा दिल्या, कर्मानंच सत्ता गमावली. आताही विरोधी पक्ष नेते आहात. महाराष्ट्र तुम्हाला टॉप थ्रीमध्ये गृहीत धरतो. त्यानंतरही असं वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचा अपमानच असल्याचं मत नागरिक व्यक्त करत आहेत. तसेच फडणवीस असं म्हणत असतील तर आता पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडेंनी काय बोलावं? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संबंधित बातम्या :

मला एकाच व्यक्तीने छळले, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस : एकनाथ खडसे

ब्राह्मण असल्यानेच देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जातंय : प्रवीण दरेकर

“एकनाथ खडसेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाचा विचार करायला हरकत नाही”

संबंधित व्हिडीओ :

Devendra Fadnavis allegation of Brahmin Caste and Maratha Reservation

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.