खंडणीबहाद्दरांना समर्पण काय समजणार, चौकातलं भाषण, सैन्याचा अपमान, फडणवीसांचे ठाकरेंवर थेट वार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विधानसभेत हल्लाबोल केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तुफानी हल्ला चढवला.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:21 PM, 3 Mar 2021
खंडणीबहाद्दरांना समर्पण काय समजणार, चौकातलं भाषण, सैन्याचा अपमान, फडणवीसांचे ठाकरेंवर थेट वार
Uddhav Thackeray_Devendra Fadnavis

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विधानसभेत हल्लाबोल केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तुफानी हल्ला चढवला. “मुख्यमंत्र्यांना इतिहास माहिती नाही, अज्ञानातून त्यांनी भाषण केलं. जे खंडणी वसुली करतात, त्यांना राम मंदिरासाठी जनतेने केलेल्या समर्पणाची किंमत काय? मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, त्यांनी औरंगाबादचं नामांतर करुन दाखवावं, त्यांच्याकडून हे शक्यच नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.  (Devendra Fadnavis attacks Maharashtra CM Uddhav Thackeray during budget session)

याशिवाय बाबरा (Babri Masjid) पाडण्यासाठी आम्ही होतो, यांचा एकही माणूस नव्हता. हे जे बोलत आहेत, यांच्यातील एकही नव्हता, ढाचा पाडण्यासाठी हजारो कारसेवक होते, आम्ही होतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? 

धन्यवाद प्रस्तावाला जी चर्चा झाली, त्या चर्चेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित होते. पूर्ण तासभर ते बोलले. पण यातासाभरात ते महाराष्ट्रात येऊच शकले नाहीत. ते चीनमध्ये गेले, पाकिस्तानात गेले, पंजाबला गेले, यूपीत गेले, ते महाराष्ट्रात येऊच शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांना आता खूप दिवस झाले, पूर्वी ते नवे होते. चौकातलं भाषण आणि सभागृहातील भाषण यातील अंतर त्यांना अजून समजलेलं नाही. सभागृहात उपस्थित झालेल्या मुद्द्यावर बोलावं लागतं. राज्यातील प्रश्नावर बोलावं लागतं. दुर्दैवाने शेतकऱ्यांबाबत ते एक मदुद्दाही बोलले नाहीत. बोंडअळी, खोडकिडी, वीजतोडणीबद्दल बोलले नाहीत, साडेतीन लाख शेतकऱ्यांची वीज तोडली त्यांची काळजी नाही, मुख्यमंत्र्यांना दिल्ली बॉर्डरवरील सिंघू बॉर्डरवर बसलेल्या शेतकऱ्यांची वीज तोडली जाते त्याची चिंता.. हे जे उत्तर होतं त्याला भ्रमनिरास हा शब्द छोटासा

हे करत असताना मुख्यमंत्र्यांनी भारतीय सैनिकांचा अपमान आहे. चीन समोर आले की पळे हे मुख्यमंत्री म्हणाले, हा सैनिकांचा अपमान, मायनस ३ अंशात भारतीय सैन्य चीनशी लढले, एक इंचही भूमी चीनला मिळू दिली नाही, चिनी सैनिकांना मागे जावं लागलं. देशाच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलं. मात्र आमचे सैनिक पळपुटे आहेत असा एकप्रकारे उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला

अमित शाहांबद्दल बोलले ते उसणे आवसान आहे. त्यांना कोणताही शब्द दिलेला नव्हता. खोटं बोल पण रेटून बोल, हे नवं रुप पाहायला मिळालं. महाराष्ट्रातील एकही प्रश्नावर बोलले नाहीत

शर्जील उस्मानी हा उत्तर प्रदेशातील आहे ते सांगत होते, पण त्या शर्जीलचं हिंदूविरोधात बोलण्याचं यूपीत धाडस नाही, तो महाराष्ट्रात येऊन बोलून जातो, त्याच्या केसाला हात लावायची या सरकारची हिम्मत नाही

सावरकरांना भारतरत्न नाही, पण सावरकरांना देशद्रोही आणि समलैंगिक म्हणणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात, सत्तेत आल्यावर हे पुस्तक आले.. आणि मुख्यमंत्री आम्हाला हिंदुत्व शिकवायला निघालेत

संभाजीनगरबाबत हास्यास्पद वक्तव्य केलं. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात कंटेट असेल तर प्रतिक्रिया देता येते.

शिवसेना स्वातंत्र्य लढ्यात नव्हती.. पण डॉ केशव हेडगेवार संघाचे संस्थापक स्वातंत्र्यसेनानी होते, याची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही.. विनाकारण राजकीय भाषण केलं.. जसं सरकारने राज्यपालांना दिलेलं भाषण महाराष्ट्राला दिशा देणारं नव्हतं, तसंच मुख्यमंत्र्यांचं चौकातलं भाषण होतं..

कोव्हिडबाबत आम्ही मांडलेल्या मुद्द्याला एकही उत्तर मुख्यमंत्री देऊ शकले नाहीत.. एव्हढं सुमार मुख्यमंत्र्यांचं भाषण यापूर्वी कधीही झालं नव्हतं,. इतिहासात पहिल्यांदाच झालं…

राष्ट्रद्रोह म्हणता, आम्ही त्यांच्यावर टीका केली तर महाराष्ट्रद्रोही, तुमचा भ्रष्टाचार बाहेर काढला तर महाराष्ट्रद्रोही, अरे पण भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्र बदनाम होतोय..

बाबरी मशिदी पाडण्यासाठी हे कुणीच नव्हते, आम्ही होतो. जनता पैसे देते, समर्पण देतेय, यांना ज्यांना खंडणी वसुलीची सवय, त्यांना जनतेच्या समर्पणाची सुई टोचतेच, सत्य जनतेसमोर आहे, सत्तेसाठी कॉम्प्रमाईज केलंय

VIDEO : देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल – पाहा 

संबंधित बातम्या 

फडणवीस म्हणाले, शर्जील उस्मानी पाताळात गेला तरी सोडणार नाही, उद्धव म्हणाले, मग कधी जाताय?

(Devendra Fadnavis attacks Maharashtra CM Uddhav Thackeray during budget session)