पंतप्रधान पदावरुन देवेंद्र फडणवीसांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा, तर पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, 'शरद पवार यांनी देशाचे नेतृत्व करावे. जर गुजरातमध्ये 26 खासदार असताना एक व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकते. मग 48 खासदार असलेल्या महाराष्ट्रातून शरद पवारही पंतप्रधान होऊ शकतात'. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात उमटलेल्या या सूराबाबत जोरदार टीका केलीय.

पंतप्रधान पदावरुन देवेंद्र फडणवीसांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा, तर पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
देवेंद्र फडणवीस, शरद पवार
Follow us
| Updated on: Dec 12, 2021 | 11:01 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त आज मुंबईत पक्षाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान व्हावे असा सूर उमटल्याचं पाहायला मिळालं. खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले की, ‘शरद पवार यांनी देशाचे नेतृत्व करावे. जर गुजरातमध्ये 26 खासदार असताना एक व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकते. मग 48 खासदार असलेल्या महाराष्ट्रातून शरद पवारही पंतप्रधान होऊ शकतात’. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात उमटलेल्या या सूराबाबत जोरदार टीका केलीय.

देवेंद्र फडणवीसांना अमोल कोल्हे यांनी उपस्थित केलेल्या पंतप्रधानपदाबाबतच्या मुद्दावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी फडणवीसांनी ‘माझ्या पवारांना खूप शुभेच्छा आहेत. स्वप्न पाहणं हे काही वाईट नाही. त्यांच्या पार्टीच्या जन्मापासून ते स्वप्न पाहत आहेत. पण त्यांचा पक्ष 10 चा आकडाही पार करु शकला नाही. त्यामुळे मला वाटतं की ठीक आहे. आज त्यांचा जन्मदिन आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा’, अशा शब्दात खोचक टोला लगावला आहे.

छगन भुजबळांचंही मोठं वक्तव्य

शरद पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जो चमत्कार झाला. तोच चमत्कार 2024मध्ये दिल्लीत होईल, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त मुंबईत व्हर्च्युअल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीला संबोधित करताना छगन भुजबळ यांनी हे विधान करून राजकीय चर्चांना वाट मोकळी करून दिली आहे. संपूर्ण देशभरात सर्वांना सोबत घेऊन जाण्याची ताकद राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जो महाविकास आघाडी सरकारचा चमत्कार झाला. तसाच चमत्कार 2024मध्ये दिल्लीत होईल. त्यासाठी पवारांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन भुजबळांनी केले.

अजित पवारांचा कंठ दाटला

वाढदिवसानिमित्त शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते सादर केली. उपमुख्यमंत्री अजित पवारही बोलायला उभे राहिले. पण शरद पवारांबद्दल बोलताना अजित पवार भारावून गेले होते. त्यांचा कंठ दाटून आला होता. पवारांबद्दल भरभरून बोलताना एका क्षणी अजितदादा अत्यंत भावूक झाले. त्यावेळी त्यांनी मला फार काही सूचत नाही, शब्द बाहेर पडत नाही, अशी भावना व्यक्त करून आपलं भाषण थांबवलं. त्यामुळे उपस्थित कार्यकर्तेही हेलावून गेले होते.

इतर बातम्या : 

Breaking : 10वी सोबतच 12वी बोर्ड परीक्षांचे ऑनलाईन अर्ज भरण्यास शाळांना मुदतवाढ

अनिल परबांशी संबंधित व्यक्तीवर किरीट सोमय्यांचा 100 कोटीच्या गैरव्यवहाराचा आरोप, दोन दिवसांत उघड करणार

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.