अयोध्येबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय कोणाचा जय-पराजय नाही : देवेंद्र फडणवीस

प्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणी दिलेल्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis on Ayodhya verdict) यांनी स्वागत केलं. मुख्यमंत्र्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

अयोध्येबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय कोणाचा जय-पराजय नाही : देवेंद्र फडणवीस

मुंबई : सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणी दिलेल्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis on Ayodhya verdict) यांनी स्वागत केलं. मुख्यमंत्र्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.  मुख्यमंत्री(Devendra Fadnavis on Ayodhya verdict) म्हणाले, “आम्ही कोर्टाच्या आदेशाचं, निर्णायचं स्वागत करतो. आदेश म्हणजे कोणाचा विजय किंवा पराजय नाही, तर भारतीय आस्था मजबूत करणारा हा निर्णय आहे”

या निर्णयाकडे वेगळ्या चष्म्यातून पाहण्याची गरज नाही. अतिशय चांगलं वातावरण मुंबईसह महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. मी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो. सर्व लोक शांतता प्रस्थापित करत विविध सण, सर्वजण साजरं करतील अशी मी आशा करतो, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

या पत्रकार परिषदेपूर्वी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली. युतीवर गहिरे संकट आलेले असताना आणि दुसरीकडे राम मंदिर निकाल वाचन होत असताना आज सकाळी राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांची भेट घेतली. राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि राजकीय परिस्थिती यावर अर्धा तास चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी कालच कारकीर्द संपल्याने मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर राज्यपालांनी आपल्याला काळजीवाहू मुख्यमंत्रिपद सांभाळण्याची जबाबदारी दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं. कालही मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेसोबत ताणलेल्या संबंधाबाबत भाष्य केलं होतं. शिवसेनेने भाजपशी संपर्क न करता केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीशीच संपर्क केल्याचा आरोप केला. तसंच अडीच अडीच वर्षांचा मुख्यमंत्री असं काहीही ठरलं नव्हतं, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यानंतर उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटारडेपणाचा आरोप केला. कारण लोकसभा निवडणुकीपूर्वी युती झाली त्यावेळी भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याच समोर मुख्यमंत्रिपदाच्या अटी ठरल्या होत्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच भाजपने ठाकरेंवर खोटारडेपणाचा आरोप करण्यापेक्षा स्वत:चा इतिहास तपासावा असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी केला होता.

या सर्व पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आजच्या पत्रकार परिषदेत काही भाष्य करतात का याची उत्सुकता होती. मात्र काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली  नाही. केवळ राम मंदिराबाबत भाष्य करुन पत्रकार परिषद आटोपती घेतली.

अयोध्या निकाल

सुप्रीम कोर्टाने शेकडो वर्षांच्या अयोध्येतील (Ram Mandir in Ayodhya supreme court verdict) मंदिर-मशीद वादावर ऐतिहासिक निर्णय दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई (Chief Justice of India Ranjan Gogoi) यांच्या नेतृत्त्वातील 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने अयोध्येतील वादग्रस्त जागी राम मंदिरच (Ram Mandir in Ayodhya supreme court verdict) होईल, असा निर्णय दिला. त्यामुळे हिंदू पक्षकार रामलल्लाच्या बाजूने निकाल लागला. मुस्लिम पक्षकार सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच अन्यत्र 5 एकर जमीन देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले.

कोर्टाने पुरातत्व विभागाच्या नोंदी, दस्तावेज आणि शेकडो वर्षांचे पुरावे तपासून हा निकाल दिला. आज सकाळी 10.30 वा. कोर्टाने निकाल वाचनाला सुरुवात केली. सुरुवातीलाच सरन्यायाधीशांनी तिसरा पक्ष शिया वक्फ बोर्डाचा जमिनीवरील दावा फेटाळून लावला. त्यामुळे रामलल्ला विरुद्ध सुन्नी वक्फ बोर्ड हे दोनच पक्षकार उरले. मग कोर्टाने रामलल्लाचा दावा ग्राह्य धरत, राम मंदिराच्या बाजूने कौल दिला.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI