महिला सुरक्षेचे विषय तरी किमान राजकारणाच्या पलिकडे ठेवा; फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी या मागणीसाठी भाजपच्या महिला मोर्चाने आज राज्यभर आंदोलन केलं. (devendra fadnavis reaction on bjp women's wing agitation)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:09 PM, 27 Feb 2021
महिला सुरक्षेचे विषय तरी किमान राजकारणाच्या पलिकडे ठेवा; फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानसभा

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी या मागणीसाठी भाजपच्या महिला मोर्चाने आज राज्यभर आंदोलन केलं. यावेळी महिला आंदोलकांना अटक करण्यात आली असून त्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. महिला सुरक्षेचे विषय तरी किमान राजकारणाच्या पलिकडे ठेवा, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. (devendra fadnavis reaction on bjp women’s wing agitation)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकापाठोपाठ तीन ट्विट करत राज्य सरकारला हा सल्ला दिला आहे. राज्यात ठिकठिकाणी महिला अत्याचाराच्या सातत्याने वाढत असलेल्या घटना, पूजा चव्हाण या भगिनीला न्याय मागण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन केले आणि महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला. सरकार हे नेहमी पालकत्त्वाच्या भूमिकेत असले पाहिजे. आमची मागणी आहे की, केवळ दबावाचे, गळचेपीचे राजकारण न करता सरकारने आधी दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी. महिला सुरक्षेचे विषय तरी किमान राजकारणाच्या पलिकडे असले पाहिजे, असा सल्ला फडणवीस यांनी ट्विटमधून दिला आहे.

महिलांचेच अटकसत्र राबविण्यात सरकारला धन्यता वाटते

सरकार दोषींवर कारवाई करीत नाही. पण, आंदोलन करणार्‍या महिलांचेच अटकसत्र राबविण्यात सरकारला धन्यता वाटते. भाजपाच्या महिला नेत्यांच्या छायाचित्रांशी छेडछाड करणार्‍या विकृतीवर कारवाईची तत्परता न दाखविता, केवळ आवाज दडपण्याच्या या दबावतंत्राचा आम्ही तीव्र निषेध करतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महिला मोर्चाचं जोरदार आंदोलन

दरम्यान, भाजपच्या महिला मोर्चाने आज संपूर्ण राज्यात एकाच वेळी जोरदार आंदोलन केलं. चांद्यापासून बांद्यापर्यंत भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या रस्त्यावर उतरल्या. यावेळी राज्य सरकार आणि वन मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. राज्यात 100 ठिकाणी तीव्र निदर्शने करण्यात आली. सुमारे 20 हजार महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.कोरोना चे सर्व नियम पाळून हे आंदोलन करण्यात आले, असा दावा भाजपने केला आहे. महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा उमा खापरे यांच्या नेतृत्वाखाली मुलुंड येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. या वेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक, प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस दीपाली मोकाशी आदी पदाधिकारी उपस्थित होत्या. आमदार सीमा हिरे यांनी नाशिक येथे आंदोलनाचे नेतृत्व केले. आमदार विद्या ठाकूर, आमदार श्वेता महाले आणि आमदार मनिषा चौधरी याही या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या.

तर तीव्र आंदोलन करू

पूजा चव्हाण या तरुणीचा संशयास्पद मृत्यू होऊन 20 दिवस उलटूनही या प्रकरणात मुख्य संशयित असलेले संजय राठोड यांच्यावर कोणतीच कारवाई केली गेली नाही. आत्तापर्यंत अनेक पुरावे माध्यमाच्या मार्फत आले आहेत. या पुराव्यांची दखल घेऊन राज्य सरकारने पूजाला न्याय देणे अपेक्षित आहे. संशयित मंत्र्याकडून राजीनामा घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करणे आवश्यक असताना मुख्यमंत्री मात्र मुग गिळून गप्प बसले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या सर्व प्रकरणात लक्ष घालुन या प्रकरणातील सर्व संशयित आरोपीचा शोध घेऊन चौकशी करावी व राठोड यांचा तातडीने राजीनामा घ्यावा अन्यथा महिला मोर्चातर्फे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा उमा खापरे यांनी दिला. (devendra fadnavis reaction on bjp women’s wing agitation)

 

संबंधित बातम्या:

Video Fact Check: वनमंत्री संजय राठोड यांचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कधीचा?

मोठी बातमी: भाजप नेते उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरे यांच्या भेटीला; मराठा आरक्षणावर चर्चा?

उद्धवजींना इशारा देतो, सोमवारच्या आत संजय राठोडांचा राजीनामा घेतला नाही, तर… : चंद्रकांत पाटील

(devendra fadnavis reaction on bjp women’s wing agitation)