फडणवीस पंढरपुरात म्हणाले, सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मलिक म्हणतात, “ना नौ मन तेल होगा, ना राधा नाचेगी!”

सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मी बघतो, असा थेट इशारा देणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी उत्तर दिलंय.

फडणवीस पंढरपुरात म्हणाले, सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मलिक म्हणतात, ना नौ मन तेल होगा, ना राधा नाचेगी!
Nawab Malik and Devendra Fadnavis
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 5:20 PM

मुंबई : सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मी बघतो, असा थेट इशारा देणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी उत्तर दिलंय. मी त्यांना सांगू इच्छितो मी “ना नौ मन तेल होगा ना राधा नाचेगी” हे सरकार पाच वर्ष टिकून आपला कालावधी पूर्ण करेल, असं नवाब मलिक म्हणाले.  (Devendra Fadnavis said Dont think about change the government I will handle it, NCPs Nawab Malik gives answer)

“पंढरपूरमध्ये मतं मागत असताना त्यांचा कार्यक्रम करु असे सांगून ते लोकांकडून मदत मागत आहेत . त्यांना घाबरवत आहेत हे काम देवेंद्रजीनी केले आहे. आणि गेले पंधरा महिने भाजप हेच करू इच्छित आहे. मी त्यांना सांगू इच्छितो मी “ना नौ मन तेल होगा ना राधा नाचेगी” हे सरकार पाच वर्ष टिकून आपला कालावधी पूर्ण करेल”, असं नवाब मलिकांनी ठणकावलं.

“ना नौ मन तेल होगा ना राधा नाचेगी” हा हिंदीतील एक वाकप्रचार आहे. न होणाऱ्या किंवा अशक्य गोष्टींबाबत बोलणं असा या वाकप्रचाराचा अर्थ आहे. त्याचाच आधार घेत नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिलं.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते? 

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभा घेतल्या. यावेळी त्यांनी सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, लवकरच बदलू, अशा शब्दात  पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला एकप्रकारे सूचक इशाराच दिला. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी मंगळवेढ्यात देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

लोक विचारतात एका मतदारसंघाची निवडणूक आहे, काय फरक पडणार, त्याने सरकार बदलतंय का? अरे सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मी बघतो..पण या मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाची आहे या सरकारचा भ्रष्टाचार, जागा दाखवायची असेल तर ही पहिली संधी आहे’, अशा शब्दात फडणवीसांनी महाविसार आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय.

संबंधित बातम्या 

Pandharpur By-Election : सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मी बघतो, पंढरपुरात देवेंद्र फडणवीसांचा पहिला थेट इशारा 

लॉकडाऊन करताना मोदींनी कुणालाच विचारात घेतलं नाही, कुणाच्या खात्यातही पैसे टाकले नाही: नवाब मलिक 

(Devendra Fadnavis said Dont think about change the government I will handle it, NCPs Nawab Malik gives answer)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.