लॉकडाऊन करताना मोदींनी कुणालाच विचारात घेतलं नाही, कुणाच्या खात्यातही पैसे टाकले नाही: नवाब मलिक

लॉकडाऊन करत असाल तर आर्थिक पॅकेज जाहीर करा, या भाजपच्या मागणीचा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समाचार घेतला आहे. (nawab malik slams bjp over lockdown in maharashtra)

लॉकडाऊन करताना मोदींनी कुणालाच विचारात घेतलं नाही, कुणाच्या खात्यातही पैसे टाकले नाही: नवाब मलिक
नवाब मलिक, अल्पसंख्यांक आणि कौशल्य विकास मंत्री
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 2:45 PM

मुंबई: लॉकडाऊन करत असाल तर आर्थिक पॅकेज जाहीर करा, या भाजपच्या मागणीचा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समाचार घेतला आहे. लॉकडाऊन करताना पंतप्रधान नरेंद मोदींनी कुणाला विचारात घेतलं नव्हतं आणि पॅकेजही जाहीर केलं नव्हतं, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे. (nawab malik slams bjp over lockdown in maharashtra)

प्रसारमाध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी ही टीका केली. देशात लॉकडाऊन करताना मोदींनी कुणाला विचारात घेतलं नाही किंवा कुणाच्याही खात्यात पैसे जमा करण्याचा कार्यक्रम केला नाही. नुसत्या राजकारणासाठी हे करा ते करा बोलणं योग्य नाही, असा टोलाही मलिक यांनी लगावला आहे.

पैसे द्या, पैसे टाका सांगणं योग्य नाही

महाराष्ट्रात अर्थव्यवस्था एकदम ठप्प झाली पाहिजे ही परिस्थिती न करता काय काय सुरु ठेवता येईल किंवा कुणाकुणाला काय मदत करता येईल याबाबत आजपर्यंत चर्चा होऊन निर्णय होईल. परंतु, जे काही भाजपचे लोक पैसे द्या, पैसे टाका सांगत आहेत ते योग्य नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान राज्यातील लोकांचा जीव वाचवण्यासाठी जे गरजेचे आहे ते निश्चितपणे सरकार करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

सेमी लॉकडाऊनची स्थिती

राज्यात सेमी लॉकडाऊनची स्थिती आहे. आज दिवसाला 63 हजार रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे सरकारने आरोग्य सेवेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. बेड्स, ऑक्सिजन पुरवठा याची व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच पुढील जो काही निर्णय असेल तो परिस्थितीचा आढाव घेऊनच घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं.

फडणवीसांनी गुजरातकडे पाहावं

कोरोना काळात संपूर्ण देशात जसे लोकांना पैसे देण्यात आले, तसे महाराष्ट्रातही देण्यात आले. मजुरांना 4 महिने दोनवेळेचं जेवण देण्यात आलं आहे, असं सांगतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्य सरकारवर आरोप करत आहेत. पण गुजरातमध्ये काय स्थिती आहे. ते त्यांनी बघावं. महाराष्ट्राने चांगलं काम केलं आहे. उत्तर प्रदेशात तर टेस्टच केल्या जात नाही, असंही त्यांनी सांगितलं. (nawab malik slams bjp over lockdown in maharashtra)

संबंधित बातम्या:

सरकार पाडतील तेव्हा फडणवीसांचं अभिनंदन करू; राऊतांचा खोचक टोला

Pandharpur By-Election : सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मी बघतो, पंढरपुरात देवेंद्र फडणवीसांचा पहिला थेट इशारा

अंबाजोगाईचं जोडपं, अमेरिकेत घटना, त्या खुनाचं कोडं उलगडलं, पहिल्यांदाच बालाजीच्या मृत्यूचं कारण उघड

(nawab malik slams bjp over lockdown in maharashtra)

Non Stop LIVE Update
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.