AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दरेकरांचं ‘रंगलेल्या गालाचं मुका प्रकरण’, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

चाकणकर यांनी दरेकरांना इशाराही दिलाय. याबाबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या कुठले मुद्दे नसल्यामुळे दरेकरांना टार्गेट केलं जात असल्याची टीका फडणवीस यांनी केलीय.

दरेकरांचं 'रंगलेल्या गालाचं मुका प्रकरण', फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस
| Edited By: | Updated on: Sep 14, 2021 | 7:28 PM
Share

नागपूर : भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. दरेकर यांनी माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलीय. तसंच चाकणकर यांनी दरेकरांना इशाराही दिलाय. याबाबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या कुठले मुद्दे नसल्यामुळे दरेकरांना टार्गेट केलं जात असल्याची टीका फडणवीस यांनी केलीय. (Devendra Fadnavis’s reply to NCP leaders who warning Praveen Darekar)

आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आधीच स्पष्ट केलं आहे की प्रवीण दरेकर यांनी बोलीभाषेत अशाप्रकारचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचे वेगळे अर्थ काढण्याची गरज नाही. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे कुठले मुद्दे नाहीत. त्यामुळे असे मुद्दे हाताशी घेऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न ते करत आहेत, अशा शब्दात फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर पलटवार केलाय.

प्रविण दरेकर काय म्हणाले?

प्रविण दरेकर काल शिरुर दौऱ्यावर होते. राजे उमाजी नाईक यांच्या 230व्या जयंती निमित्ताने जय मल्हार क्रांती संघटनेने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी दरेकर यांनी हे विधान केलं. प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि शांताबाई फेम गायक संजय लोंढे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना दरेकर यांनी राष्ट्रवादीवर हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे, अशी टीका दरेकर यांनी केलीय. त्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. आमदार अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दरेकरांवर जोरदार हल्ला चढवला आहे. दरेकर यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येतेय.

चाकणकरांचा हल्लाबोल

दरेकर यांच्या या विधानावर रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. दरेकर यांचं हे विधान महिलांचा अवमान करणारं आहे. प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा. नाही तर आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा, असा इशारा चाकणकर यांनी दिला आहे.

फडणवीसांची ऊर्जा विभागावर टीका

राज्य सरकारला थकीत वीज बिलाची सावकाराप्रमाणे वसुली करायची आहे. म्हणून सरकारकडून बाऊ निर्माण केला जात आहे. कोरोनामुळे एकीकडे शेतकरी आणि सामान्य नागरिक अडचणीत असताना त्यांना मदत करण्याऐवजी सरकारला त्यांच्याकडून जबरदस्तीने वसुली करायची असल्यामुळे हे नाटक सुरु असल्याची टीकाही फडणवीस यांनी केलीय. ऊर्जा मंत्र्यांनी जे सादरीकरण केलं त्यातून हे स्पष्ट होतं की त्यांच्या काळात किती थकबाकी वाढली, असा टोलाही फडणवीस यांनी लगावलाय.

इतर बातम्या :

EXCLUSIVE : तर मला ‘सामना’चं काम सोडावं लागेल : संजय राऊत

प्रवीण दरेकरांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; पुण्यात जोडे मारो आंदोलन, तर उस्मानाबादेत वंगण फासण्याचा इशारा

Devendra Fadnavis’s reply to NCP leaders who warning Praveen Darekar

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....