धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर भरकटलं!

धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर भरकटलं!

कोल्हापूर : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर भरकटलं आहे. कोल्हापुरात परिवर्तन सभा आयोजित करण्यात आली आहे. त्या सभेसाठी धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे जात होते. तिकडे जात असतानाच, हेलिकॉप्टर भरकटल्याची घटना घडली.

कोल्हापुरातील कागलमध्ये परिवर्तन यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे येणार होते. मात्र, हेलिकॉप्टर भरकटल्याने मुंडे आणि भुजबळ पोहोचू शकले नाहीत.

धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे दोघेही नेते सुखरुप आहेत.

वाऱ्याचा वेग उलट दिशेने असल्याने धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर भरकटलं. त्यामुले कोल्हापूरऐवजी धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर बीडमध्ये उतरवण्यात आलं. याबाबतची माहिती राष्ट्रवादीचे कोल्हापुरातील नेते हसन मुश्रीफ यांनी सभास्थळी दिली.

मी सुखरुप, हेलिकॉप्टर भरकटले नव्हते, अफवांवर विश्वास ठेवू नका : धनंजय मुंडे

दरम्यान, हेलिकॉप्टर भरकटलं नव्हतं, त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. ते म्हणाले, “मी बीड येथील भगवानगडाचा कार्यक्रम संपवून कोल्हापूरच्या सभेसाठी जात आहे. हेलिकॉप्टर भरकटल्याची बातमी चूक असून काहीही झालेले नाही, आम्ही 10 मिनिटांत कोल्हापूरच्या विमानतळावर उतरू. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये. माझ्यावर भगवंताची कृपा आणि जनतेच्या सदिच्छा आहेत.”

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI