धुळ्याचे काँग्रेस आमदार डी. एस. अहिरे भाजपच्या वाटेवर?

सचिन पाटील

सचिन पाटील | Edited By:

Updated on: Sep 30, 2019 | 9:29 AM

जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार डी. एस. अहिरे (Congress mla D S Ahire may join bjp) भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा साक्री मतदारसंघात सुरु आहे.

धुळ्याचे काँग्रेस आमदार डी. एस. अहिरे भाजपच्या वाटेवर?

धुळे : जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार डी. एस. अहिरे (Congress mla D S Ahire may join bjp)  भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा साक्री मतदारसंघात सुरु आहे. साक्री मतदारसंघ (Sakri Constituency) काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. तसेच धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघ हा संपूर्ण जिल्ह्यात महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो.

गेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे डी. एस. अहिरे (Congress mla D S Ahire may join bjp) यांनी भाजपच्या मंजुळा गावित यांचा पराभव केला होता. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपला मिळालेलं मताधिक्य पाहता विधानसभा निवडणुकीत भाजपचं पारडं जड राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे डी. एस. अहिरे भाजपच्या तिकिटावर साक्री मतदारसंघातून उभे राहतील असं बोललं जात आहे.

2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे डी एस अहिरे यांनी मंजुळा गावित यांचा तीन हजार 323 मतांनी पराभव केला होता. अत्यंत कमी मतांनी मंजुळा गावित यांचा पराभव झाल्याने काँग्रेससाठी ही चिंतेची बाब आहे. यंदाच्या होणाऱ्या निवडणुकीत मंजुळा गावित या भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात असतील, असंही बोललं जात आहे. त्यामुळे अहिरे यांना तिकिट मिळेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघ भाजपच्या गोविंद शिवराम चौधरी यांच्या नावाने ओळखला जातो. सन 1984 ते 1999 या कालावधीत गोविंद चौधरी हे भाजपच्या तिकिटावर या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यावेळी त्यांना मंत्रिपद मिळालं होतं. शिवराम चौधरी यांच्या रूपाने प्रथमच साक्री तालुक्याला मंत्रिपद मिळालं होतं. मात्र आजतागायत या मतदारसंघातील समस्या कायम आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत साक्री लोकसभा मतदारसंघातून भाजपाला मोठ्या प्रमाणावर मताधिक्य मिळालं होत. साक्री तालुका नंदुरबार लोकसभा मतदारसंघात येतो. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार हिना गावित यांना या तालुक्यातून सहा लाख 39 हजार 126 मते मिळाली होती. यामुळे ही बाब देखील काँग्रेससाठी आत्मचिंतन करायला लावणारी आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ कोणाकडे जातो, की काँग्रेसचा बालेकिल्ला ही ओळख कायम ठेवतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI