AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती करू नका… भाजपमध्ये प्रवेश करताच पहिल्याच दिवशी बड्या नेत्याची मागणी; युतीत तणातणी वाढणार?

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्याच दिवशी गोरंट्याल यांनी मोठी मागणी केली आहे. त्यामुळे शिवसेना भाजप युतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे.

शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती करू नका... भाजपमध्ये प्रवेश करताच पहिल्याच दिवशी बड्या नेत्याची मागणी; युतीत तणातणी वाढणार?
devendra fadnavis and eknath shinde
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 31, 2025 | 7:52 PM
Share

काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जालन्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्याच दिवशी गोरंट्याल यांनी मोठी मागणी केली आहे. त्यामुळे शिवसेना भाजप युतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कैलास गोरंट्याल यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयावर बोलताना कैलास गोरंट्याल म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरमध्ये जी भूमिका घेतली त्याने मी प्रभावित झालो आणि मी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला. प्रणिती शिंदे यांना काय बोलायचंय ते बोलू द्या, पण मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, मोदींनी काम भारी केलंय.

अर्जुन खोतकरांना प्रत्युत्तर

शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांना गद्दार असं म्हटलं आहे. यावर बोलताना गोरंट्याल म्हणाले की, ‘माझ्यावर अर्जून खोतकरांनी आरोप केलेत, महापालिकेचा मुद्दा काढला, भ्रष्टाचारचा आरोप केला, असं काही नाही. अर्जून खोतकर यांनी विलासराव देशमुख असताना कांग्रेस मध्ये जाण्याचा प्रयत्न केला, नारायण राणेंसोबत गेला, मग खरा गद्दार कोण आहे?

गँगस्टरमध्येही नियम असतात की फॅमिलीवर जायचं नाही, पण हा माझ्या फॅमिलीवर गेला आत्ता मी यांच्या फॅमिलीवर जाणार. माझ्याकडे याच्या 10 प्रकरणांच्या फाईल्स आहेत, त्यांची आई कासाबाईच्या नावाने फ्लॅट, हिरानंदानीला घर घेतलं, 22 वर्षाचा जावई आहे तो अंडर 19 खेळला. या माणसामागे दोनदा ईडी लावली.’ असं गोरंट्याल यांनी म्हटलं आहे.

पन्नास खोके एकदम ओके घोषणेवर स्पष्टीकरण

गोरंट्याल यांनी पन्नास खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी केली होती. यावर बोलताना त्यांनी, ‘मी एक शायर आहे. पन्नास खोके एकदम ओके तेव्हा बोललो होतो तेव्हा परिस्थिती वेगळी होती, आत्ता वेगळी आहे. गम के आंसुओं पर संभव कर चलनी पडता हैं ये दुनिया हैं, यहां चेहरा सजा कर चलनी पडता हैं, सियासत साजिशों की चाल हैं यहाँ हर चाल सें बच के चलनी पडता हैं असं स्पष्टीकरण दिलं आहे.

शिवसेनेसोबत युती नको…

पुढे बोलताना गोरंट्याल म्हणाले की, ‘यापूर्वीही माझ्यावर आरोप करण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांना सगळं माहीत आहे. खोतकरांना नगरपालिका कळत नाही. त्यांच्या शुभेच्छा नको मला, त्यांना सांगा शुभेच्छा परत घ्या. मनपात जालन्यात 40 जागा येतील, शिवसेनेसोबत युती करू देऊ नका अशी फडणवीस यांना गळ घातलीये. जालन्यात भाजपचा महापौर बसवायचाय. शिवसेना सोडून सगळ्यांना सोबत नेणार असंही गोरंट्याल यांनी म्हटलं आहे.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था